शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या आंबा महोत्सवाला उलवे येथे प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 16:34 IST

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उलवे नोडमध्ये  आयोजित करण्यात आलेल्या कोंकण आंबा महोत्सवाला नागरिकांचा प्रतिसाद लाभत आहे.

पनवेल - महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उलवे नोडमध्ये  आयोजित करण्यात आलेल्या कोंकण आंबा महोत्सवाला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे . दि. १६ ते २२ मे दरम्यान उलवे नोड येथे सेक्टर १९ मधील भूमिपुत्र भावनासमोरील मैदानात  हा कोंकण आंबा महोत्सव भरविण्यात आला आहे . रत्नागिरी , रायगड , सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील उच्च प्रतीची आंबा या महोत्सवात ग्राहकांसाठी ठेवण्यात आलेला आहे.  अमादार बाळाराम पाटील , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांच्यासह महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ अधिकारी यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन पार पडले . सध्याच्या घडीला नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात आंब्याच्या विक्री जागोजागी केली जाते . यापैकी अनेक आंबा विक्रेते हे परप्रांतीय असताना . कोंकणातील आंब्याच्या नावाखाली कर्नाटकी आंबे तसेच कार्बाइड मिश्रित आंब्यांची विक्री त्यांच्यामार्फत केली  जाते . हे आंबे आरोग्याला घातक असतात . या आंब्याच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात दलालांचा देखील समावेश असल्याने चढ्या भावात आंब्याची विक्री केली जाते . अशा परिस्थितीत शेतक-यांनी पिकविलेला उच्च प्रतीचा आंबा थेट ग्राहकांना मिळावा या हेतूने उलवा नोड याठिकाणी हा महोत्सव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत भरविण्यात आलेला आहे. कोंकणातील शेतक-यांना याठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.तीन दिवसात हजारोंच्या संख्येने ग्राहकांनी या महोत्सवाला भेट दिली आहे . २० ते २५ स्टोल्स च्या माध्यमातून विविध शेतकरी याठिकाणी आंब्याची विक्री करत आहेत. विशेष म्हणजे शहरी भागात अस्सल कोंकणचा आंबा ग्राहकांना उपलब्ध होत असल्याने ग्राहक मोठ्या संख्येने याठिकाणी धाव घेत आहेत. या महोत्सवात पुढील दिवसातील कोंकणातील फणस, आंबे करवंदे देखील ग्राहक वार्गाला उपलब्ध करून दिली जातील, अशी माहिती पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांनी दिली. पनवेल सहा नवी मुंबईमधील नागरिकांनी या आंबा महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन आयोजक पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :MangoआंबाNavi Mumbaiनवी मुंबई