शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

जिल्हा कार्यकारिणीचा राजीनामा

By admin | Updated: February 20, 2015 00:06 IST

सुडाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप करीत मनविसेच्या सांस्कृतिक विभागाच्या संपूर्ण जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे सादर केले आहेत.

नवी मुंबई : मनसेच्या स्थानिक नेतृत्वाकडून गटबाजी आणि सुडाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप करीत मनविसेच्या सांस्कृतिक विभागाच्या संपूर्ण जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे सादर केले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर स्थानिक नेतृत्वाच्या कार्यपद्धतीविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत.मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या कार्यपद्धतीवर पक्षातून जोरदार टीका होत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मनविसेचे शहराध्यक्ष शिरीष पाटील यांच्यासह मनसेचे माजी शहराध्यक्ष जितेंद्र कांबळी, कृष्णा पाटील आदींनी आपल्या समर्थकांसह सोडचिठ्ठी दिली होती. त्यांच्यापाठोपाठ आता मनविसे सांस्कृतिक विभागाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अमर पाटील, शहराध्यक्ष गिरीराज दरेकर यांनीही आपल्या संपूर्ण कार्यकारिणीसह राजीनामे सादर केले आहेत. पाटील व दरेकर यांनी मनविसेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदित्य शिरोडकर यांना पत्र पाठवून आपल्या पदाचा व पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून होणारे खच्चीकरण व सूडभावनेच्या राजकारणामुळे राजीनामा दिल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद न साधता राजीनामे सादर करणे योग्य नाही. तक्रारी असल्यास थेट संपर्क साधून चर्चा करावी. चर्चेतून मार्ग निघू शकतो, अशी प्रतिक्रिया मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)च्मनविसे सांस्कृतिक विभागाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अमर पाटील, शहराध्यक्ष गिरीराज दरेकर यांनीही कार्यकारिणीसह राजीनामे सादर केले आहेत.च्त्यामुळे पक्षातील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.