शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव वीजबिलाच्या विरोधात रहिवासी आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 00:16 IST

महावितरणच्या या व्यावसायिक भूमिकेच्या विरोधात शहरवासीयांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, वाढीव बिले कमी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

नवी मुंबई: अगोदरच लॉकडाउनमुळे त्रस्त झालेल्या नवी मुंबईकरांना महावितरणने वाढीव बिलाचा शॉक दिला आहे. कोणतेही रीडिंग न घेता, सरसकट वाढीव बिले पाठविली आहेत. अगोदरच आर्थिक कोंडीत असलेल्या ग्राहकांना तीन महिन्यांची बिले एकत्रित भरण्यास सांगितल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. महावितरणच्या या व्यावसायिक भूमिकेच्या विरोधात शहरवासीयांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, वाढीव बिले कमी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे, तसेच शासकीय कार्यालये बंद होती. त्यामुळे या काळात महावितरणकडून विद्युत मीटरची रीडिंग घेण्यात आली नाही, परंतु आता तीन महिन्यांची एकत्रित बिले पाठविण्यात आली आहेत. ही बिले सरासरीपेक्षा अधिक असल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. या संदर्भात बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सोमवारी महावितरणचे वाशी विभागाचे कार्यकारी अभियंता श्यामकांत बोरसे यांची भेट घेऊन वाढीव बिले तातडीने कमी करण्याची मागणी केली, तसेच तीन महिन्यांची एकत्रित बिले भरणे नागरिकांना शक्य होणार नाही. त्यामुळे एकत्रित बिले न देता, रीडिंग घेऊन नियमाप्रमाणे प्रति महिन्याचे बिल देण्यात यावे, तसेच त्यावरील येणारे दंड, व्याज व अधिभार हे माफ करून एकूण येणारे बिल२४ हप्त्यांमध्ये वर्ग करून आकारले जावे, अशी मागणी मंदा म्हात्रे यांनी केली आहे. या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोनल छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.दरम्यान, या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन देणार असल्याचे मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे. विद्युत देयकांसंदर्भात शासनाचा धोरणात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत विद्युत देयके वितरित करू नयेत, अशी मागणीसुद्धा त्यांनी यावेळी केली. या सर्व मागण्या वरिष्ठाकडे मांडून, त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंते श्यामकांत बोरसे यांनी दिले. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी स्थायी समिती सभापती संपत शेवाळे, भाजपा महामंत्री विजय घाटे, उदयवीर सिंग आदीउपस्थित होते.