शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

घणसोलीत मलनिःसारण वाहिन्यांवर निवासी बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 02:00 IST

उद्यानाची भिंतही बळकावली : दूषित पाणी येते उद्यानात

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : घणसोली येथील २० हून अधिक घरांच्या मलनिःसारण वाहिन्यांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यासाठी उद्यानाच्या भिंतीचा आधार घेण्यात आला आहे. यामुळे मलनिःसारण वाहिन्या नादुरुस्त होऊन त्यामधील दूषित पाणी उद्यानात साचत आहे. या अतिक्रमणावर कारवाई करण्याऐवजी पालिका अधिकारी चालढकल करीत आहेत. 

महापालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्चून उद्याने विकसित केली जात आहेत. मात्र अनेकदा उद्यानांची निगा राखली जात नसल्याचे पाहायला मिळते. परंतु घणसोली येथे उद्यान सुस्थितीत असतानादेखील उद्यानाच्या भिंतीवर झालेल्या अतिक्रमणामुळे त्याला अवकळा आल्याचे पाहायला मिळत आहे. घणसोली सेक्टर ४ येथील भूखंड क्रमांक २१४ वर विकसित उद्यानाच्या ठिकाणी हा प्रकार पाहायला मिळत आहे. या उद्यानाच्या लगतच काही निवासी सोसायट्या आहेत. त्यामधील उद्यानाकडील बाजूच्या रहिवाशांनी उद्यानाच्या भिंतीवरच अतिक्रमण केले आहे. उद्यान व सोसायटीमधील खुल्या जागेत असलेल्या मलनिःसारण वाहिन्यांची जागाच त्यांनी बळकावली आहे. सुरुवातीला काही व्यक्तींनी एका विकासकाला हाताशी धरून हे बांधकाम करून घेतले. यानंतर २ घरे वगळता सर्वच रहिवाशांनी खासगी विकासकामार्फत उद्यानाच्या भिंतीवर अतिक्रमण करून तिथली मलनिःसारण वाहिन्यांची जागा हडपली आहे. मागील दोन वर्षांत यासंदर्भात अनेकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या. त्यानंतर अतिक्रमण विभागाकडून पालिकेच्याच उद्यानावर झालेल्या अतिक्रमणाकडे डोळेझाक करण्यात आली. परिणामी, दुरुस्तीअभावी सध्या तिथल्या मलनिःसारण वाहिन्या तुंबण्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे मलमिश्रित दूषित पाणी उद्यानात साचत आहे. 

आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्षउद्यानाचा काही भाग पूर्ण दूषित झाल्याने कर्मचाऱ्यांना सफाई करणे अवघड झाले आहे. तर साचलेल्या सांडपाण्यामुळे जमीन ओलसर होऊन उद्यानाची भिंत  कोसळण्याच्या स्थितीत आहे. यानंतरही अधिकाऱ्यांकडून अतिक्रमणाला पाठीशी घालून उद्यानावर होणारा खर्च व्यर्थ घालविण्याचे काम होत आहे. त्यामुळे पालिका आयुक्तांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई