शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पाच वर्षांतील बांधकामांचा अहवाल द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 00:14 IST

घणसोलीमधील अ‍ॅटलान्टिस टॉवरमधील अनधिकृत बांधकाम तत्काळ जमीनदोस्त करावे.

नवी मुंबई : घणसोलीमधील अ‍ॅटलान्टिस टॉवरमधील अनधिकृत बांधकाम तत्काळ जमीनदोस्त करावे. इमारतीची बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवकांनी स्थायी समिती बैठकीमध्ये केली आहे. शहरामध्ये अजूनही विकासकांनी चटईक्षेत्राची चोरी केली असण्याची शक्यता असून पाच वर्षांतील बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्रांचा तपशील सादर करण्याचे आदेश सभापतींनी दिले आहेत.नवी मुंबईमधील अनधिकृत बांधकामांची संख्या वाढत आहे. परवानगी घेऊन बांधलेल्या इमारतीमध्येही मंजूर चटईक्षेत्रापेक्षा जास्त बांधकाम केले जात आहे. भोगवटा प्रमाणपत्र मंजूर केल्यानंतर अनधिकृत बांधकाम करण्याचे प्रमाण वाढत आहे. घणसोली सेक्टर ११ मधील भूखंड क्रमांक ५वर अ‍ॅटलान्टिस टॉवर उभारण्यात आले आहे. या टॉवरमध्ये टेरेसचे बेडरूममध्ये रूपांतर केल्याचे व इतर अनधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास आले आहे. ‘लोकमत’ने याविषयी आवाज उठविल्यानंतर त्याचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीमध्येही उमटले. शिवसेना नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांनी सांगितले की, या व इतर इमारतीमध्ये अनधिकृत बांधकाम झाले असल्याची तक्रार २०१७ मध्येच केली होती. प्रशासनानेही भोगवटा प्रमाणपत्र देताना योग्य काळजी घेतली जाईल, असे सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात काळजी घेण्यात आलेली नाही. इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाले असून संबंधितांची बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्र दोन्ही रद्द करण्यात यावे. अनधिकृतपणे केलेले बांधकाम पाडण्यात यावे अशी मागणी या वेळी सभागृहात केली. प्रशासन प्रकल्पग्रस्तांची घरे तत्काळ पाडते व मोठ्या बिल्डरांच्या अतिक्रमणाला पाठीशी घालत असल्याबद्दल त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक देविदास हांडे पाटील यांनीही शहरात अनेक विकासक अतिक्रमण करत आहेत. घणसोलीमध्ये एका इमारतीमध्ये घरे विकत घेताना प्रलोभने दाखवत आहेत. टेरेस कव्हर करून एक रूम वाढविता येईल व इतर आमिषे दाखविली जात आहेत. अशाप्रकारे चुकीचे काम करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.घणसोलीमधील अतिक्रमणाची तत्काळ पाहणी करून कारवाई करावी, अशी मागणी नामदेव भगत यांनी केली आहे. नगररचना विभागाचे सहायक संचालक ओवैस मोमीन यांनी सभागृहात प्रतिक्रिया देताना सांगितले की, विकासकाने केलेले बांधकाम तपासून त्यांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करून बांधकामाची छायाचित्रेही काढण्यात आली आहेत.भोगवटा प्रमाणपत्रानंतर अतिक्रमण झाले असण्याची शक्यता आहे. अतिक्रमण होत असल्यास त्याच्यावर लक्ष देण्याची जबाबदारी त्या विभाग कार्यालयातील व अतिक्रमण विभागाची असल्याचेही त्यांनी सभागृहात स्पष्ट केले. सभापती सुरेश कुलकर्णी यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पाच वर्षांतील बांधकामांचा अहवाल पुढील सभेत सादर करण्याचे आदेश दिले.अतिरिक्त आयुक्त महावीर पेंढारी यांनीही घणसोलीमधील इमारतीमधील अतिक्रमणाची पाहणी करून पुढील १५ दिवसांत कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.>अतिक्रमण प्रकरणी प्रशासनाने दुटप्पी भूमिका घेऊ नये. घणसोलीमधील इमारतीमध्ये किती अतिक्रमण झाले आहे याची तत्काळ पाहणी करावी. अतिक्रमण झाल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई करणे आवश्यक आहे.- नामदेव भगत,शिवसेना नगरसेवकविकासक घर खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना टेरेस व इतर भाग कव्हर करून स्वतंत्र रूम होऊ शकतो असे आश्वासन देत आहेत. ठरवून अतिक्रमण केले असून हे प्रकार थांबले पाहिजेत. चुकीच्या पद्धतीने बांधकाम करणाºयांवर कारवाई झालीच पाहिजे.- देविदास हांडे पाटील,नगरसेवक राष्ट्रवादी काँगे्रस>‘लोकमत’च्या वृत्ताची दखलघणसोलीमधील अ‍ॅटलान्टिस टॉवरमधील अतिक्रमणावर ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते. इमारतीमध्ये करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम व इतर गोष्टी निदर्शनास आणून दिल्यानंतर त्याची दखल घेऊन नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये या विषयावर आवाज उठविला.