शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
5
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
7
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
8
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
9
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
10
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
11
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
12
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
13
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
14
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
15
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
16
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
17
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
18
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
19
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
20
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

बुलेटच्या मार्गातील वन जमिनीचा अडथळा दूर; ठाणे-पालघरची ३२४ एकर वन जमीन एनएचएसआरसीएलकडे सुपूर्द

By नारायण जाधव | Updated: July 28, 2023 16:42 IST

...यामुळे हा मार्ग ज्या जमिनीतून जाणार आहे, अशी ३२४ एकर २९ गुंठे वन जमीन शिंदे सरकारने आता एनएचएसआरसीएल अर्थात नॅशनल हायस्पीड रेल्वे काॅर्पोरेशनकडे गुरुवारी सुपूर्द केली आहे.

नवी मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट मार्गात एका मागोमाग एक येणारे अडथळे राज्यातील विद्यमान एकनाथ शिंदे सरकारने दूर करण्याचा सपाटा लावला आहे. बुलेट ट्रेनच्या मुंबईतील बीकेसी आणि ठाणे स्थानकासाठी आवश्यक जमिनीचा तिढा सोडविल्यानंतर आता सर्वात मोठी अडचण असलेल्या वन जमिनीचा अडथळाही दूर करण्यात आला आहे. बुलेट ट्रेनचा ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील मार्ग वन जमिनीतून जातो. यामुळे हा मार्ग ज्या जमिनीतून जाणार आहे, अशी ३२४ एकर २९ गुंठे वन जमीन शिंदे सरकारने आता एनएचएसआरसीएल अर्थात नॅशनल हायस्पीड रेल्वे काॅर्पोरेशनकडे गुरुवारी सुपूर्द केली आहे.

बुलेट ट्रेनसाठी वन जमीन महाराष्ट्र शासनाने दिल्यानंतर आता नॅशनल हायस्पीड रेल्वे काॅर्पोरेशनचा तिच्या आखणीचा मार्ग सुकर झाला आहे. ही जमीन कोणत्या भागात आहे, त्यात किती झाडे तोडावी लागणार आहेत, याबाबतचा तपशील एनएचएसआरसीएलने आता वृत्तपत्रात प्रसिद्ध करायचा आहे.

ठाणे-पालघर जिल्ह्याच्या वेशीवरील तुंगारेश्वर अभयारण्यातून बुलेट ट्रेनचा मार्ग जातो. यामुळे हजारो वृक्षांवर कुऱ्हाड कोसळणार असून अभयारण्यातील पक्षी, प्राणी यांच्या अस्तित्वावरही गदा येणार आहे. यामुळे ही वन जमीन ताब्यात घेण्याचे मोठे संकट एनएचएसआरसीएल समोर होते.

बुलेट ट्रेनसाठी एनएचएसआरसीएलने १३१.३०१९ हेक्टर अर्थात ३२८ एकर २५ गुंठ्यावर वन जमीन मागितली होती; मात्र या प्रस्तावाच्या छाननीनंतर राज्याच्या महसूल आणि वन विभागाने १२९.७१९७ हेक्टर अर्थात ३२४ एकर २९ गुंठे वन जमीन देण्यास संमती दिली.

२० एकर ९९ गुंठे खारफुटीचा समावेशमहाराष्ट्र शासनाने गुरुवारी एनएचएसआरसीएलला जी ३२४ एकर २९ गुंठे वन जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात ८.३९७८ हेक्टर अर्थात २० एकर ९९ गुंठ्याच्यावर खारफुटीचाही समावेश आहे. याशिवाय संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची ०.११३८ हेक्टर, ठाणे जिल्ह्यातील ४९.५३४५ हेक्टर म्हणजेच १२३ एकर ८३ गुंठे आणि पालघर जिल्ह्यातील डहाणूची ७१.६७३६ हेक्टर अर्थात १७९ एकर १९ गुंठे वन जमिनीचा समावेश आहे.

एनएचएसआरसीएलने यापूर्वीच देशातील समुद्राखालील ७ किलोमीटरच्या बोगद्यासह बीकेसी ते शीळफाटापर्यंतचा २१ किलोमीटर भूमिगत मार्ग बांधण्याचे ६३९७ कोटी रुपयांचे काम ॲफकॉन्स कन्स्ट्रक्शन्सला दिले आहे. तसेच राज्यातील सर्वांत लांब असलेला १३५ किलोमीटरचा उन्नत मार्गाचे कंत्राट एल ॲन्ड टी कंपनीस दिले आहे. याच मार्गासाठी आवश्यक असलेल्या ३२४ एकर वन जमिनीचा अडथळा आता दूर झाला आहे. 

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनEknath Shindeएकनाथ शिंदेrailwayरेल्वे