शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

अभियंता पदासाठी अट शिथिल करा, एम्प्लॉईज युनियनचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 04:38 IST

प्रकल्पग्रस्तांना फटका : एम्प्लॉईज युनियनचे मुख्यमंत्र्यांना साकडे

नवी मुंबई : सिडकोच्या स्थापत्य विभागात सध्या सहायक अभियंता पदाची भरती प्रक्रिया सुरू आहे. परंतु या भरतीसाठी उमेदवारांना एक वर्षाच्या अनुभवाची अट घालण्यात आली आहे. ही अट प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या मुळावर बेतणारी ठरली आहे. त्यामुळे अनुभवाची अट शिथिल करा, अशी मागणी सिडको एम्प्लॉईज युनियनने केली आहे. यासंदर्भात त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे.

मागील काही वर्षात प्रकल्पग्रस्त तरुणांचा शिक्षणाकडे ओढा वाढला आहे. अनेक तरुण उच्चशिक्षित आहेत. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले आहेत. गेल्या मागील शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकी पदवी संपादित केलेले अनेक प्रकल्पग्रस्त तरुण आहेत. अनुभवाच्या अटीमुळे या उमेदवारांना नोकरीच्या संधीपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे सिडकोने त्वरित ही अट शिथिल करून प्रकल्पग्रस्त तरुणांना न्याय द्यावा, अशी मागणी युनियनच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळाबाधितांसाठी सिडकोच्या वतीने विविध पुनर्वसन योजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यांच्या पाल्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी सिडको तारा कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामाध्यमातून प्रकल्पग्रस्त तरुणांना प्रशिक्षण दिले जात आहे. एकूणच प्रकल्पग्रस्तांची मुले चांगले शिक्षण घेवून सार्वजनिक क्षेत्रातील नोकरीसाठी सक्षम व्हावेत, हा यामागचा सिडकोचा हेतू आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसह सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना निवेदन दिले.सिडकोच्या स्थापत्य विभागात ७६ सहायक अभियंता पदाची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पदासाठी उमेदवारांना एका वर्षाच्या अनुभवाची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे फ्रेश पदवी घेतलेल्या प्रकल्पग्रस्त तरुणांना नोकरीपासून वंचित राहावे लागणार आहे. ही अट शिथिल केल्यास विमानतळबाधित गावांसह नवी मुंबईतील अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलेल्या सर्व प्रकल्पग्रस्तांच्या तरुणांना न्याय मिळणार आहे.- जे.टी.पाटील, सरचिटणीससिडको एम्प्लॉईज युनियन 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcidcoसिडकोDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस