शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

नवी मुंबई सेझची 5,286 एकर जमीन रिलायन्सकडे; १,६२८ कोटींना ५७.१२ कोटी इक्विटी शेअर्सची खरेदी

By नारायण जाधव | Updated: January 14, 2025 11:57 IST

रिलायन्सने ५७.१२  कोटी इक्विटी शेअर्स विकत घेतले असून प्रतिशेअरची किंमत २८ रुपये ५० पैसे आहे. 

- नारायण जाधवनवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी आणि अटल सेतूनजीकची नवी मुंबई सेझची सुमारे ५,२८६ एकरपेक्षा जास्त जमीन रिलायन्स समूहाने १,६२८ कोटी ३ लाख रुपयांमध्ये शेअर्सच्या माध्यमातून द्रोणागिरी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडकडून अधिग्रहित केली आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वात मोठा वाणिज्यिक आणि औद्योगिक जमीन सौदा असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

याबाबतची माहिती आनंद जैन यांच्या जय कार्प लिमिटेडने सेबी अर्थात स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर होल्डिंग्सच्या उपकंपनी म्हणजेच द्रोणागिरी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडने पूर्वीच्या नवी मुंबई सेझ व आताच्या नवी मुंबई एकात्मिक औद्योगिक क्षेत्रामधील ७४ टक्के हिस्सा रिलायन्स समूहास अवघ्या १,६२८ कोटी तीन लाख रुपयांना शेअर्स स्वरुपात विकला आहे. रिलायन्सने ५७.१२  कोटी इक्विटी शेअर्स विकत घेतले असून प्रतिशेअरची किंमत २८ रुपये ५० पैसे आहे. 

नकाराधिकार नाकारलापूर्वाश्रमीच्या नवी मुंबई सेझमधील ही जमीन असल्याने या व्यवहारात सिडकोने आपला नकाराधिकार मागे घेतल्यानंतर हा व्यवहार  पूर्ण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. रिलायन्सनेही याबाबत सेबीला कळविले आहे. या सेझमध्ये सिडकोचा २६ टक्के हिस्सा आहे. बाजारमूल्यापेक्षा शेअर्स स्वरूपातील हा व्यवहार कितीतरी पटीने कमी असल्याचे सांगितले जाते.

एकात्मिक औद्योगिक वसाहतीस परवानगी- या शेअर्स अधिग्रहणानंतर रिलायन्सही आता एनएमआयआयए अर्थात नवी मुंबई एकात्मिक औद्योगिक क्षेत्र या कंपनीची ७४ टक्के हिस्सा असलेली टक्के उपकंपनी बनली आहे. - एनएमआयआयएची स्थापना १५ जून २००४ रोजी झाली असून, ती  महाराष्ट्रात एकात्मिक औद्योगिक क्षेत्र विकसित करेल असे सांगून मार्च २०१८ साली तत्कालीन महाराष्ट्र सरकारने एनएमआयआयएला सेझऐवजी एकात्मिक औद्योगिक क्षेत्रात रूपांतरित करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार एनएमएमआयआयची द्रोणागिरी, कळंबोली या अधिसूचित क्षेत्रांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई