शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कुवेतच्या तुरुंगात अडकलेल्या नाशिकच्या तरुणांची सुटका; बुडालेल्या जहाजातून वाचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 09:14 IST

ऑल इंडिया सिफेरर्स युनियनने केली मदत

- नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नाशिकमधील दोन तरुण डिसेंबर २०२३ मध्ये नोकरीसाठी इराणमधील जहाजावर गेले होते. परंतु, कुवेतच्या किनाऱ्यावर  जहाज बुडाले. सुदैवाने ते दोघे वाचले, मात्र तेथील तुरुंगात अडकले होते. अखेर ऑल इंडिया सिफेरर्स युनियनच्या पाठपुराव्यानंतर दोन्ही तरुणांची सुटका झाली असून, १ मार्चला ते सुखरूप मुंबईत परतले आहेत. 

आविष्कार जगताप व निवृत्ती बागूल अशी सुटका झालेल्या तरुणांची नावे आहेत. त्यांना एका एजंटने सेल्फ इमिग्रेशनच्या माध्यमातून इराणला पाठविले होते. तेथील जहाजावर नोकरी करत असताना १९ जानेवारीला कुवेतच्या किनाऱ्यावर त्यांचे जहाज बुडाले. जहाजावरील इतर सहकारी बुडाले. परंतु, आविष्कार व निवृत्ती हे दोघे बोटीतून सुखरूप किनाऱ्यावर येण्यात यशस्वी झाले. कुवेतमधील अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसल्यामुळे त्यांना तुरुंगात टाकले. शेतकरी कुटुंबातील या तरुणांना सोडविण्याचे आव्हान कुटुंबीयांसमोर उभे राहिले होते. ऑल इंडिया सिफेरर्स युनियनने यापूर्वी अशाप्रकारे विदेशात अडकलेल्या तरुणांची सुटका केल्याची माहिती समजल्यानंतर त्यांनी युनियनचे कार्याध्यक्ष अभिजित सांगळे व अध्यक्ष संजय पवार यांच्याशी संपर्क साधला. दोघांनी कुवेतमधील भारतीय  दूतावासाशी संपर्क साधून दोन्ही तरुणांची सुटका केली.

एजंटकडून होते फसवणूकनोकरीची गरज असलेल्या तरुणांना इराण, मलेशिया, दुबई, सौदी अरेबियासारख्या देशांमध्ये पाठविले जाते. या व्यवसायात अनेक बोगस दलालही सक्रिय झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून जहाजावर गेलेल्या तरुणांची कागदपत्र काढून घेतली जातात. अनेक तरुण तेथे अडकत असून, अशा प्रकारे तरुणांना गुलामगिरीत ढकलणाऱ्या दलालांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही सिफेरर्स युनियनने नवी मुंबई पोलिस आयुक्तांकडे केली आहे. 

एक महिन्यापासून कुवेतमध्ये अडकलो होतो. ऑल इंडिया सिफेरर्स युनियनच्या पाठपुराव्यामुळे तेथून सुटका झाली व पुन्हा मायदेशी परत आलो आहोत. - आविष्कार जगताप, निवृत्ती बागूल, नाशिक

दोन खलाशी कुवेतमध्ये अडकल्याचे निदर्शनास आले. संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधला. परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून त्यांची सुखरूप सुटका करण्यास सहकार्य केले. - संजय पवार, अध्यक्ष, ऑल इंडिया सिफेरर्स युनियन