शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

भूखंड हस्तांतराबाबत सिडकोचे तळ्यात मळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 23:33 IST

पनवेल महापालिकेचा पाठपुरावा; सार्वजनिक सुविधांच्या निर्मितीत अडथळा येत असल्याची तक्रार

- वैभव गायकरपनवेल : सिडकोकडून सार्वजनिक वापरातील विविध भूखंड पालिकेकडे हस्तांतर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यापैकी काही भूखंडाचे करारपत्र देखील तयार आहेत. मात्र सिडकोच्या वतीने संबंधित हस्तांतर प्रक्रि येबाबत मिळणारा प्रतिसाद कमी असल्याने पालिकेने याबाबत स्वतंत्र अधिकारी नेमण्याची मागणी सिडको व्यवस्थापकीय संचालकांना केली आहे.सिडकोच्या मार्फत आयुक्त बंगला तसेच महापौर बंगल्याच्या भूखंडासाठी जीएसटी आकारण्याच्या निर्णयाला पालिकेने विरोध दर्शविला होता. सिडको महामंडळाने यासंदर्भात जीएसटी प्राधिकरणाकडे धाव घेतली होती. यावेळी जीएसटी प्राधिकरणाने दोन्ही भूखंडासाठी जीएसटी सूट देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आयुक्त व महापौर बंगल्याचा मुद्दा मार्गी लागला. मात्र प्रभाग कार्यालये, मुख्यालय, मार्केट यापैकी काही भूखंड जीएसटीच्या दरामधील त्रुटींमुळे हस्तांतर रखडले आहे. सिडकोच्या मार्फत एकूण ३६0 भूखंड पालिकेकडे हस्तांतरित केले जाणार आहेत. यापैकी सिडकोने दिलेल्या ११९ भूखंडापैकी ८४ भूखंडांचे अलॉटमेंट लेटर तातडीने देण्याची गरज आहे.या भूखंडामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, समाज मंदिर, अग्निशमन केंद्र आदीचा समावेश आहे. मात्र सिडकोच्या इस्टेट आणि नियोजन विभागाच्या मार्फत या हस्तांतर प्रक्रि येला हव्या त्या पद्धतीने गती मिळत नसल्याने पालिकेने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालकांकडे याबाबत पत्रव्यवहार सुरू केला आहे. हस्तांतर प्रक्रि या वेळेत पूर्ण होण्यासाठी एक अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांची स्वतंत्रपणे नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी पालिकेच्या मार्फत करण्यात आली आहे.या भूखंडाच्या हस्तांतरात सामाजिक सेवेतील उद्याने, गार्डन, मैदाने आदी देखील प्रति चौरस मीटर ६0 रु पये दराने देण्यात येणार आहेत. या भूखंडाच्या हस्तांतरणात देखील जीएसटी कर लादले गेल्याने पालिकेने या संदर्भात जीएसटी माफ करण्याची मागणी केली आहे.पालिका क्षेत्रातील रहिवाशांच्या जनहितासाठी आमचा सिडकोसोबत पाठपुरावा सुरू आहे. या प्रक्रि येला गती मिळण्यासाठी सिडकोच्या वतीने आवश्यक अधिकारी उपलब्ध होत नसल्याने हस्तांतरणाची प्रक्रि या लांबणीवर पडली आहे.- शहाजी भोसले, सहायक आयुक्त, पनवेल महापालिकाहस्तांतराच्या प्रक्रि येतील भूखंडमैदाने, उद्याने, आरक्षित भूखंड १६६स्मशानभूमी, दफनभूमी २८प्राथमिक आरोग्य केंद १२शाळा ९समाज मंदिर १२व्यवस्थापन कार्यालये ८अग्निशमन केंद्र ६प्रभाग कार्यालय, मुख्यालय ५मार्केट १४४एकूण ३६0

टॅग्स :cidcoसिडको