शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

ग्रामस्थांच्या आग्रहास्तव होणार फेरसुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 1:20 AM

पनवेल, उरण आणि ठाणे परिसरातून जाणाºया मल्टी मॉडेल कॉरिडॉर प्रकल्पाच्या जनसुनावणीत पनवेल तसेच उरण परिसरातील स्थानिक ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागला.

पनवेल : पनवेल, उरण आणि ठाणे परिसरातून जाणाºया मल्टी मॉडेल कॉरिडॉर प्रकल्पाच्या जनसुनावणीत पनवेल तसेच उरण परिसरातील स्थानिक ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागला. स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधामुळे १७ जानेवारी रोजी पनवेल येथे आयोजित करण्यात आलेली बैठक अर्धवट सोडून फेरसुनावणी घेण्याची वेळ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ रायगड यांच्यावर आली. या प्रकल्पाबाबत ग्रामस्थांना योग्य माहिती नसल्याने योग्य माहिती देऊन फेर सुनावणी घेण्याची मागणी केली होती.मल्टी मॉडेल कॉरिडॉर प्रकल्पाबाबत बुधवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ रायगड यांच्या वतीने नवीन पनवेल येथील पिल्लई महाविद्यालयात पर्यावरणाबाबत जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने प्रादेशिक अधिकारी अनंत हर्षवर्धन, उपविभागीय अधिकारी डी. आर. नवले, सचिन आडकर यांच्या उपस्थितीत ही जनसुनावणी घेण्यात आली. या अधिकाºयांसोबत पनवेल आणि उरण परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. जनसुनावणी सुरू झाल्यानंतर उरण विभागातील समाजसेवक संतोष पवार आणि काही रहिवाशांनी जनसुनावणीचा निषेध व्यक्त करत ही जनसुनावणी तहकूब तसेच स्थगित करण्याची मागणी केली. आजचा दिवस हा उरणकरांसाठी प्रेरणादायी असा दिवस असल्याचे संतोष पवार यांनी सांगितले. उरणच्या लढ्यात या वेळी ५ हुतात्मा झाले होते. त्यांच्या आठवणींचा आजचा दिवस हुतात्मा दिन म्हणून आयोजित केला जातो. या हुतात्मा दिनी ही जनसुनावणी ठेवल्यामुळे हा निषेध व्यक्त करण्यात आला. निषेध व्यक्त करून ग्रामस्थांनी या प्रकल्पाची माहिती तसेच या जनसुनावणीची माहिती शेतकºयांना नसल्यामुळे ही सुनावणी तहकूब करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. मात्र यावेळी उपस्थित प्रदूषण मंडळ अधिकाºयांनी ही जनसुनावणी सुरूच ठेवून ग्रामस्थांची बाजू ऐकून घेऊन त्यांना या प्रकल्पाची माहिती दिली.जनसुनावणीसाठी ३० ग्रामस्थ उपस्थित होते. प्रदूषण मंडळाच्या वतीने पिल्लई कॉलेज नवीन पनवेल येथे घेतलेल्या जनसुनावणीला खुर्च्या रिकाम्या असल्याचे चित्र दिसून येत होते. केवळ ३० ग्रामस्थांच्या उपस्थितीत जनसुनावणी सुरू झाली.