शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-शेकापमध्ये वर्चस्वाची खरी लढाई

By admin | Updated: April 24, 2017 23:51 IST

महापालिका निवडणुकीसाठी पनवेलमधील सर्व पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. या निवडणुकीत शेकाप आणि भाजपामध्येची

पनवेल : महापालिका निवडणुकीसाठी पनवेलमधील सर्व पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. या निवडणुकीत शेकाप आणि भाजपामध्येची खरी लढत होणार असल्याने या दोन्ही पक्षांनी आपापल्या परीने मतदारांना आकर्षित करण्याचा धडाका लावला आहे. खारघर हा महापालिका क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा नोड आहे. या विभागात तीन प्रभागांचा समावेश आहे. त्यामुळे भाजपा आणि शेकापमध्ये या विभागात खऱ्या अर्थाने वर्चस्वाची लढाई होणार आहे. पूर्वाश्रमीच्या खारघर ग्रामपंचायतीवर शेकापची एकहाती सत्ता होती. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शेकापसमोर खारघर कॉलनी फोरम वगळता कोणाचेच आव्हान नव्हते. परंतु आता खारघर शहरातील चित्र बदलले आहे. शेकापसमोर आता भाजपाचे कडवे आव्हान असणार आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी या क्षेत्रावर आपले अधिक लक्ष केंद्रित केले आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा लीना गरड यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना खारघरमध्ये आणून येथील गोखले शाळेजवळील मैदानात शेतकरी पुत्र मेळावा भरवला होता. लीना गरड या भाजपाच्या प्रभाग क्र मांक ५ मधून इच्छुक उमेदवार आहेत. विशेष म्हणजे त्यानंतर लगेच शेकापने देखील याच ठिकाणी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांची सभा घेवून भाजपाच्या मेळाव्याला जशास तसे उत्तर दिले. या प्रभागातून शेकापच्या वतीने संजय घरत, सोमनाथ म्हात्रे, सीमा घरत हे इच्छुक आहेत. लीना गरड यांनी खारघर कॉलनी फोरमचे अध्यक्षपद भूषविले आहे. तसेच त्यांनी अलीकडेच भाजपात प्रवेश केल्याने या क्षेत्रात पक्षाची ताकद वाढली आहे. या प्रभागातून शेकापच्या वतीने निवडून येऊन थेट सरपंचपदी विराजमान झालेल्या वनिता विजय पाटील या देखील भाजपात गेल्याने शेकापची काही प्रमाणात कोंडी झाली आहे. भाजपाच्या वतीने या प्रभागात युवा मोर्चाचे अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, रामजी भाई पटेल,मामा मांजरेकर, अमर उपाध्याय, शंकर शेठ ठाकूर हे इच्छुक आहेत. खारघर शहरातील सर्वात मोठा असलेल्या प्रभाग क्रमांक ६ मधून देखील दोन्ही पक्षाकडून अनेक इच्छुक उमेदवार आहेत. भाजपाकडून अ‍ॅड.नरेश ठाकूर , प्रीती ठोकले, सुरेश ठाकूर ,दत्ता वर्तेकर, कीर्ती नवघरे,शेकापमधून भाजपामध्ये आलेले नीलेश बाविस्कर, सेनेतर्फे मनेश पाटील, रामचंद्र देवरे, रोशन पवार, यशोदा गायकवाड आदी इच्छुक आहेत. तर शेकापकडून संतोष गायकर, अशोक गिरमकर, उषा आडसुळे,राष्ट्रवादीच्या अ‍ॅड. संध्या शारिबद्रे, दत्ता ठाकूर, मंजुळा तांबोळी, अंजनी ठाकूर आदींचा समावेश आहे. भाजपा-सेनेच्या युतीवर देखील अनेक उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. (प्रतिनिधी)