शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

टेक ऑफसाठी सज्ज... नवी मुंबई! दोन दशकांपासून पाहिलेलं स्वप्न येणार सत्यात

By नारायण जाधव | Updated: June 12, 2023 15:44 IST

गेल्या दोन दशकांपासून नवी मुंबईकरांनी पाहिलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न पुढच्या वर्षी डिसेंबरअखेर सत्यात उतरणार आहे.

नारायण जाधव

गेल्या दोन दशकांपासून नवी मुंबईकरांनी पाहिलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न पुढच्या वर्षी डिसेंबरअखेर सत्यात उतरणार आहे. सिडकोसह ‘जीव्हीके’ आणि आता ‘अदानी समूहा’ने घेतलेली मेहनत व त्यांना महाराष्ट्र आणि केंद्र शासनाने दिलेली साथ, भूसंपादनासाठी स्थानिक भूमिपुत्रांनी केलेल्या त्यागामुळे विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. यामुळे डिसेंबर २०२४ पर्यंत येथून पहिल्या विमानाचे उड्डाण होईलच, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ जून रोजी विमानतळाची कामाची पाहणी केल्यानंतर व्यक्त केला. सर्व परवानग्या तत्काळ देण्यासाठी महाराष्ट्र शासन आग्रही असल्याची ग्वाही उभयतांनी दिल्याने ‘सिडको’ आणि ‘अदानी समूहा’चा विश्वास दुणावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ फेब्रुवारी २०१८ रोजी विमानतळाची पायाभरणी केली. नंतर २०२१ च्या सुरुवातीला विमानतळाच्या उभारणीत अडथळा असलेल्या टेकडीचे सपाटीकरण, उलवे नदीचा प्रवाह वळविण्याच्या कामांसह मुख्य धावपट्टी आणि टर्मिनल इमारतीच्या कामाने वेग पकडला. खरंतर १९९० च्या दशकात ‘सिडको’ने सर्वप्रथम नवी मुंबईत आंतरदेशीय विमानतळ उभारण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला कार्गो आणि टप्प्याटप्प्याने प्रवासी वाहतूक सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट केले. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाहतुकीचा ताण पडू लागल्याने मग कालांतराने नवी मुंबईचे नियोजित विमानतळ आंतरराष्ट्रीय करण्याचा निर्णय घेऊन त्यानुसार कामाला सुरुवात केली. त्यानुसार या विमानतळावर मोठमोठी विमाने उतरावीत म्हणून त्याचा एरोड्रोम कोड ४ एफ करून त्यासाठी डिझाइन तयार करून मग पर्यावरण, वनविभागासह इतर परवानग्यांसह भूसंपादनाला सुुरुवात केली. यात बराच कालावधी लोटल्याने खर्चही वाढला; परंतु या सर्वांवर मात करून अखेर विमानतळाच्या कामाला सुरुवात झाली.

अशी आहे भागीदारी

  • सुरुवातीला ‘जीव्हीके’ विमानतळ विकास कंपनीने फेब्रुवारी २०१७ मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्यासाठी बोली जिंकली. 
  • यात ‘जीव्हीके’चा हिस्सा ७४ टक्के, सिडको १३ टक्के आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण १३ टक्के मालकी होती. 
  • नंतर सप्टेंबर २०२० मध्ये ‘अदानी समूहा’ने ‘जीव्हीके’चा हिस्सा विकत घेऊन भांडवल उभे करण्यासाठी ‘एसबीआय’सोबत करार केला. 
  • त्यानंतर विमानतळाचे बांधकाम सुरू करून डिसेंबर २०२४ मध्ये येथून कोणत्याही परिस्थितीत विमानाचे उड्डाण करण्याचा ध्यास सिडको-अदानी समूहाने घेतला आहे.

पहिल्या टप्प्यात चार टर्मिनल

  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी २२ किलोमीटरचा सीलिंक, रेवस-कंरजा ब्रीज महत्त्वाचा दुवा ठरेल. 
  • दरवर्षी ९ कोटी प्रवासी वाहतूक होणार असून, याची क्षमता वाढविण्यासाठी परवानगीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. 
  • पहिल्या टप्प्यात चार टर्मिनल असून, ४२ विमाने उभी राहतील. 
  • ५,५०० क्षमतेचे कार पार्किंग राहणार असून, ११.४ किलोमीटर परिसरात दोन धावपट्ट्या उभारण्यात येत आहेत.

 

  • क्षेत्र- १,१६० हेक्टर
  • अंदाजे खर्च- १६,७०० कोटी
  • अंतिम मुदत- २०२४ (फेज १ च्या ऑपरेशनची सुरुवात)
  • नोडल एजन्सी- सिडको
  • ऑपरेटर- नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड
  • आर्किटेक्ट- झाहा हदीद आर्किटेक्ट
  • नागरी बांधकाम कंत्राटदार- लार्सन अँड टुब्रो
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ