शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई विमानतळाहून ३० मिनिटांत गाठा मुंबई; सिडकोच्या मेट्रोचा मानखुर्दपर्यंत विस्तार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 10:20 IST

विशेष म्हणजे राज्य शासनाने सिडकोच्या मानखुर्दपर्यंतच्या मेट्रो मार्गाच्या प्रस्तावाला मंजुरीही दिली आहे.

 कमलाकर कांबळे

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर सिडकोने दळणवळणाच्या सक्षम यंत्रणांवर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून दक्षिण नवी मुंबईत मेट्रोचे चार मार्ग प्रस्तावित केले आहेत. त्यांपैकी बेलापूर ते पेंधर हा ११  किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा वाहतुकीस सज्ज झाला आहे. या मार्गाचा पुढे मानखुर्दपर्यंत विस्तार करण्याची  योजना आहे. तसेच नवी मुंबई विमानतळास कल्याण-तळोजा मेट्रो मार्गास जोडण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे राज्य शासनाने सिडकोच्या मानखुर्दपर्यंतच्या मेट्रो मार्गाच्या प्रस्तावाला मंजुरीही दिली आहे. त्यानुसार या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यासाठी सिडकोने अर्बन मास ट्रान्सिट कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. पुढील पाच महिन्यांत ही कंपनी आपला अहवाल सादर करणार असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे.

बेलापूर ते मानखुर्द हा मार्ग १४ किलोमीटर लांबीचा असून, तो थेट नवी मुंबई  आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडला जाणार आहे.  या मार्गावर नवी मुंबईत वाशी, सानपाडा, जुईनगर आणि सागरसंगम अशी स्थानके असणार आहेत;  तर दक्षिण नवी मुंबईतील खांदेश्वर येथून आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रोची जोड दिली जाणार आहे. प्रस्तावित बेलापूर ते मानखुर्द हा मार्ग एमएमआरडीएने उभारलेल्या मेट्रो-८ ला जोडणार आहे. मेट्रोचा मार्ग क्रमांक ८  हा थेट मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडला गेला आहे. त्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा प्रवास अवघ्या ३० मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. प्रवाशांच्यादृष्टीने हे खूपच फायदेशीर ठारणार आहे. 

मेट्रो प्रकल्पासाठी ४,९२७ कोटी खर्चनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या माध्यमातून दळणवळणाच्या अद्ययावत सुविधा विकसित केल्या जात आहेत. त्यानुसार विमानतळ क्षेत्रातील प्रमुख वसाहतींना जोडण्यासाठी मेट्रोचे २६.७६  किलोमीटर लांबीचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला आहे. चार टप्प्यांत प्रस्तावित असलेल्या या  मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे;  तर उर्वरित तीन टप्प्यांच्या दृष्टीने सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे. या  तीन टप्प्यांत मेट्रो निओ ही स्वस्त आणि सुरक्षित सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने सिडकोने चाचपणी सुरू केली आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी ४९२७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यांपैकी पहिल्या टप्प्यासाठी ३०६३ कोटी रुपये खर्च केले आहेत. 

कल्याणच्या प्रवाशांना थेट विमानतळ गाठता येणारएमएमआरडीएचा  कल्याण-तळोजा मेट्रो-१२  प्रकल्पाचे कामसुद्धा प्रगतिपथावर आहे. हा मार्ग तळोजा एमआयडीसी-कळंबोली-खांदेश्वरमार्गे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडला जाणार आहे. मेट्रो १२ प्रकल्पात सिडको क्षेत्रात केवळ चार कि.मी. लांबीचा समावेश आहे. या मार्गामुळे डोंबिवली, कल्याणच्या प्रवाशांना थेट विमानतळ गाठता येणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रो