पावसामुळे शहरात तापाची साथ; काळजी घेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:53 PM2019-07-24T23:53:14+5:302019-07-24T23:53:22+5:30

रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली

Rains fever; | पावसामुळे शहरात तापाची साथ; काळजी घेण्याचे आवाहन

पावसामुळे शहरात तापाची साथ; काळजी घेण्याचे आवाहन

Next

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात पावसामुळे तापाची साथ असून रुग्णालयात रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. हिवताप व डेंग्यू आजाराचे रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना व मोहिमा हाती घेण्यात आल्या आहेत. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शहरात वाढत असलेली तापाची साथ लक्षात घेता महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना व मोहिमा हाती घेण्यात आल्या आहेत. यामध्ये घरांतर्गत डास उत्पत्ती स्थाने शोध मोहीम घेऊन दूषित स्थाने नष्ट करण्यात येत आहेत, त्याचप्रमाणे सायंकालीन डास सर्वेक्षण करून अधिक डास घनता असलेल्या कार्यक्षेत्रातील बंद गटारांमध्ये रासायनिक धुरीकरण करण्यात येत आहे.
तसेच त्यानंतर बंद गटारांच्या लाद्या उघडून डास अळीनाशक फवारणी करण्यात येत आहे. अशा कार्यक्षेत्रामध्ये आवश्यकतेनुसार आठवड्यातून दोनदा डास अळीनाशक फवारणी करण्यात येत आहे. जून व जुलै महिन्यात 110 जनजागृतीपर शिबिरे घेण्यात आली असून ४८ शाळांच्या सहयोगाने त्या परिसरात जनजागृीतपर रॅली काढण्यात आली आहे. ५६ शाळांमध्ये इयत्ता ७ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. डासांचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच हिवतापाचे संक्र मण होऊ नये याकरिता नागरिकांनीही सहकार्य करण्याची गरज असून गच्चीवरील, घराच्या परिसरातील भंगार साहित्य, रिकाम्या बाटल्या, करवंट्या, रंगाचे डबे, उघड्यावरील टायर्स अशी पाणी साचण्याची संभाव्य ठिकाणे नष्ट करावीत, फुलदाण्या ट्रे, फेंगशुई यामध्ये साचलेले पाणी आठवड्यातून एकदा बदलावे, घरामधील व घराबाहेरील पाणी साठविण्याचे ड्रम, टाक्या, भांडी आठवड्यातून एकदा पाणी पूर्णपणे काढून कोरडे करावे, शक्य झाल्यास डास प्रतिबंधात्मक मच्छरदाणीचा वापर करावा, घरी येणारे महापालिकेचे आरोग्य कर्मचारी यांचेमार्फत तसेच पालिकेच्या सर्व रु ग्णालयांमध्ये, दवाखान्यांमध्ये तापाच्या रु ग्णाची मोफत रक्त तपासणी करून घ्यावी, घर, कार्यालय, व परिसर येथे पाणी साचू देऊ नये, असे आवाहन करतानाच हिवताप, डेंग्यू आजाराचा रु ग्ण आढळल्यास नजीकच्या महापालिका रु ग्णालयात, दवाखान्यात तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शहरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी महापालिका कटिबध्द असून नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने केलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन महापौर जयवंत सुतार व आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Web Title: Rains fever;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस