शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील रेल्वे स्थानकांसह प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 04:24 IST

नवी मुंबई शहरातील रेल्वे स्थानकांमध्ये अग्निरोधक यंत्रणा, तपासणी आदी सुरक्षा यंत्रणांचा अभाव असून रेल्वे स्थानकाच्या आवारात देखील फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे.

नवी मुंबईनवी मुंबई शहरातील रेल्वे स्थानकांमध्ये अग्निरोधक यंत्रणा, तपासणी आदी सुरक्षा यंत्रणांचा अभाव असून रेल्वे स्थानकाच्या आवारात देखील फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. यामुळे स्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची आणि रेल्वे स्थानकांची सुरक्षा रामभरोसे आहे.नवी मुंबई शहर सिडकोने निर्माण करताना नागरिकांना दळणवळणासाठी रेल्वे सुरू केली. भविष्यात मुंबईप्रमाणे नवी मुंबई शहरात देखील लोकसंख्या वाढणार असल्याची दखल घेत अत्याधुनिक आणि सोयी-सुविधायुक्त रेल्वे स्थानकांची निर्मिती केली आहे. परंतु रेल्वे स्थानकांमधील सुरक्षा यंत्रणा अपुरी पडू लागली असून अनेक त्रुटी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आगीसारख्या घटना घडल्यास कोणतीही प्राथमिक उपाययोजना नसल्याचे समोर आले आहे. स्थानकातील सुरक्षेच्या दृष्टीने अग्निरोधक यंत्रणा बसविण्यात आली होती, परंतु या यंत्रणेची देखभाल दुरु स्ती होत नसल्याने सदरची यंत्रणा बंद पडली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकात आग लागण्यासारखी दुर्घटना घडल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. शहरातील अनेक रेल्वे स्थानकांमध्ये सिडकोने व्यावसायिक गाळे, कार्यालये बांधली आहेत. यामध्ये विविध आयटी कंपन्यांची कार्यालये, खासगी व्यावसायिक कार्यालये, सिनेमा गृह, मॉल, शॉपिंग सेंटर, बँका, एटीएम, हॉटेल, फास्ट फूडचे स्टॉल आदी थाटण्यात आले आहेत. यामधील बºयाच ठिकाणी अग्निरोधक यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. परंतु रेल्वे स्थानकामधील अनेक ठिकाणी फास्ट फूडचा व्यवसाय करणारे व्यावसायिक कोणतीही परवानगी न घेताच सर्रास घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करीत आहेत. त्यामुळे देखील एखादी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. रेल्वे स्थानकात विविध विद्युत केबलचे जाळे पसरले असून त्याकडे देखील सिडकोचे दुर्लक्ष झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे स्थानकांमध्ये ठेवण्यात आलेल्या बंकरची देखील दुरवस्था झाली असून बंकरच्या आतील बाजूस कचºयाचे साम्राज्य पसरले आहे.रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेसाठी सिडकोने सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे, परंतु या सुरक्षा रक्षकांना न जुमानता स्थानकांच्या आवारात फेरीवाले व्यवसाय करीत आहेत. रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या तपासणीसाठी कोणतीही यंत्रणा कार्यान्वित नसल्याने सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.अग्निरोधक यंत्र चालविण्याचे अज्ञाननेरु ळ रेल्वे स्थानकातील द्वारका हॉटेलमध्ये काही महिन्यांपूर्वी आग लागली होती. यावेळी हॉटेलमधील कर्मचाºयांना अग्निरोधक यंत्रणा हाताळण्याची माहिती नसल्याने आगीवर नियंत्रण मिळविता आले नाही. तसाच प्रकार मागील आठवड्यात नेरु ळ रेल्वे स्थानकातील युनियन बँकेत लागलेल्या आगीवर देखील अग्निरोधक यंत्र हाताळण्याचे ज्ञान नसल्याने अग्निरोधक यंत्र असतानाही आगीवर नियंत्रण मिळविता आले नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई