शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतील आरोग्य केंद्रात रेबीज लसीचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 03:44 IST

 दिवसेंदिवस रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून श्वानदंशानंतर महापालिकेच्या वतीने विनाशुल्क रेबीज लसीकरण केले जाते.

नवी मुंबई - दिवसेंदिवस रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून श्वानदंशानंतर महापालिकेच्या वतीने विनाशुल्क रेबीज लसीकरण केले जाते. मात्र महापालिकेच्या दिघा, ऐरोली,घणसोली, कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, नेरूळ आणि बेलापूर या आठ विभागातील प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रात लसीकरणाची सुविधा नसल्यामुळे शेकडो श्वानदंश झालेल्या रु ग्णांची गैरसोय होत आहे.एप्रिल २०१७- ते मार्च २०१८ या अकरा महिन्यांच्या कालावधीत नवी मुंबईतून एकूण ४१६३ भटकी कुत्री पकडण्यात आली. त्यापैकी ३२२४ कुत्र्यांवर निर्बीजीकरण करण्यात आले. तर उर्वरित जखमी, चावरी आणि रोगी कुत्र्यांवर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले. शहरात श्वानदंश होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. श्वानदंश झालेल्या रूग्णांवर महापालिकेच्या रूग्णालयात उपचार केले जातात. परंतु अनेक नागरी आरोग्य केंद्रांमध्ये सद्यस्थितीमध्ये लस उपलब्ध होत नाही. महापालिकेच्या रूग्णालयाव्यतिरिक्त नागरी आरोग्य केंद्रात रेबीजची लस मिळत नसल्यामुळे श्वानदंश झालेल्या रुग्णाची परवड होत आहे. प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करण्याची मागणी घणसोली येथील काँग्रेसचे माजी नगरसेवक दीपक दगडू पाटील यांनी महापालिका आयुक्त रामास्वामी एन.यांच्याकडे केली आहे.सद्यस्थितीमध्ये महापालिकेच्या बेलापूर, वाशी, ऐरोली आणि नेरूळ येथील रु ग्णालयात जावून रेबीजची लस टोचून घेण्यासाठी जावे लागत आहे. यासाठी पालिकेने श्वानदंश झालेल्या रुग्णांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रात ही सुविधा उपलब्ध करावी, असे पाटील यांनी आयुक्तांना दिलेल्या लेखी तक्र ारीत म्हटले आहे.नागरिकांचीही नाराजीश्वानदंश झालेल्या रुग्णांवर वेळेत उपचार मिळणे आवश्यक आहे. तुटवड्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण व स्थायी समितीमध्येही औषध खरेदी व आरोग्य विभागाच्या प्रत्येक कामाला तत्काळ मंजुरी दिली जाते. प्रशासनानेही दक्षता ठेवून औषधांची कमतरता भासू देवू नये अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.रेबीज लसीकरणाचा डोस एका वेळी आठ तासांच्या आत पाच रु ग्णांना द्यायचा असतो. नागरी आरोग्य केंद्रात श्वानदंश झालेले रु ग्ण कमी येत असल्यामुळे महापालिकेच्या हे रेबीज इंजेक्शनची सुविधा सर्व नागरी आरोग्य केंद्रात ठेवता येत नाही. त्यासाठी महापालिकेच्या वाशी, नेरूळ, बेलापूर आणि ऐरोली या चार रु ग्णालयात रेबीज लसीकरणाची सुविधा करण्यात आलेली आहे.- डॉ. दयानंद कटके,वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईHealthआरोग्य