शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधकामाचा प्रश्न पुन्हा चर्चेत; ग्रामस्थ सरसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 23:43 IST

नवनिर्वाचित आमदारांच्या भूमिकेकडे लक्ष

नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधकामे कायम करण्याच्या मुद्यावर सर्वच राजकीय पक्षांकडून मतांचे राजकारण करण्यात येत आहे. मागील तीन निवडणुका याच मुद्यावर लढल्या गेल्या. विशेष म्हणजे यासंदर्भात शासन दरबारी निर्णय होवूनसुध्दा मागील दहा वर्षापासून हा प्रश्न जैसे थे रहिला आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सुध्दा सर्वच राजकीय पक्षांकडून पुन्हा गरजेपोटीच्या बांधकामांचा प्रश्न अग्रस्थानी ठेवण्यात आला होता. निवडणुक लढवणाऱ्या नेत्यांनी प्रचारादरम्यान प्रकल्पग्रस्तांना पुन्हा गोंजारुन आश्वासनांचे गाजर दाखविल. आता निवडणुका संपल्या आहेत. नवीन आमदारही निवडूण आले आहेत. त्यामुळे आता तरी मुद्याचे बोला, असा सूर आता प्रकल्पग्रस्तांनी नवनिर्वाचित आमदारांकडे लावून धरला आहे.

सिडकोने साडेबारा टक्के योजनेतील भूखंडांचे वाटप प्रकल्पग्रस्तांना करण्यास दिरंगाई केल्याने प्रकल्पग्रस्तांनी गावठाणाशेजारी असलेल्या मोगळ्या जागेत कुटुंबसंख्या वाढल्याने गरजेपोटी बांधकामे केली आहेत. गरजेपोटी बांधण्यात आलेल्या घरांची संख्याही साधारणत २0 हजारांच्या वर असल्याने ती बांधकामे आहे त्या स्थितीत कायम करण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधकामांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सिडकोच्या संचालक मंडळाने सदर बांधकामे कायम करण्यासंदर्भात २00७ मध्ये निर्णय घेऊन शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. त्यानुसार राज्य शासनाने २0१0 मध्ये प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली गरजेपोटी बांधकामे कायम करण्यासंदर्भात निर्णय घेऊन सिडकोला तसे कळविले होते. परंतु त्यावर सिडकोच्या माध्यमातून कोणतीही कार्यवाही झाली नाही. परिणामी हा प्रश्न मागील ९ वर्षापासून रेंगाळला आहे.

दोन वर्षांपूर्वी सिडकोच्या तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांनी, प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के योजनेअंतर्गत भूखंडाचे वाटप करणे अद्याप बाकी असल्याचे कारण नमूद करत सिडकोच्या जमिनीवर प्रकल्पग्रस्तांनी अतिक्रमण करुन बांधलेली गरजेपोटी बांधकामे आहेत त्या स्थितीत कायम करणे शक्य नसल्याचे कळविले होते. यापार्श्वभूमीवर गरजेपोटी बांधकामे नियमित करण्याचा प्रश्न प्रामुख्याने सोडवण्याची जबाबदारी नवी मुंबईतील नवनिवार्चीत आमदारांवर येऊन पडली आहे. त्यामुळे याप्रकरणी नवी मुंबईतील नवनिर्वाचित आमदार काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधकामांचा प्रश्न मागील पंधरा वर्षांपासून रेंगाळला आहे. प्रत्येक विधानसभा व लोकसभा निवडणुकीत नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांचा प्रश्न प्रचाराचा प्रमुख मुद्दा राहिला आहे. प्रत्येक राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यात नवी मुंबईतील गरजेपोटी घरांचा प्रश्न समाविष्ट केलेला असतो. त्याद्वारे प्रकल्पग्रस्तांचा प्रश्नांवर आम्ही किमी आग्रही आहोत, हे दाखवून देण्याचा अट्टाहास सर्वच राजकीय पक्षांकडून सुरु असतो.काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार राज्यात दहा वर्षे सत्तेत असताना प्रकल्पग्रस्तांसाठी काही करु शकले नाहीत. त्यानंतर २0१४ मध्ये राज्यात सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेना युतीने देखील या प्रश्नाला बगल दिली. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांत सर्वच राजकर्त्यांविषयी अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcidcoसिडकोMLAआमदार