शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

काँक्रीटीकरणासाठी पालिकेला बसणार साडेचार कोटींचा भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 02:45 IST

उरण फाटा ते तुर्भे उड्डाणपुलापर्यंतच्या सर्व्हिस रोडच्या कामाचे काँक्रीटीकरण करण्याचा ३८ कोटी ६९ लाख रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीने सप्टेंबर २०१८ मध्ये फेटाळला होता.

नवी मुंबई : उरण फाटा ते तुर्भे उड्डाणपुलापर्यंतच्या सर्व्हिस रोडच्या कामाचे काँक्रीटीकरण करण्याचा ३८ कोटी ६९ लाख रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीने सप्टेंबर २०१८ मध्ये फेटाळला होता. फेरनिविदेमध्ये कामाची रक्कम ४२ कोटी ८९ लाखांवर गेली आहे. पालिकेवर ४ कोटी ५९ लाख रुपयांचा भुर्दंड पडणार असून स्थायी समिती काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.महानगरपालिकेने औद्योगिक वसाहतीमधील प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सायन - पनवेल महामार्गाला लागून असलेल्या उरण फाटा ते तुर्भे उड्डाणपुलापर्यंतच्या सर्व्हिस रोडचे काँक्रीटीकरणाचाही यामध्ये समावेश होता. प्रशासनाने मार्च २०१८ मध्ये या कामासाठी निविदा मागविल्या होत्या. प्रक्रिया पूर्ण करून सप्टेंबर २०१८ च्या सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. ३८ कोटी ३० लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीने कोणतेही सबळ कारण न देता नामंजूर केला होता. यामुळे यासाठी फेरनिविदा मागविण्यात आली. गुरुवारी २७ जूनला होणाऱ्या स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव पुन्हा मंजुरीसाठी येणार आहे. ३८ कोटींचे काम ४ कोटी ५९ लाखाने वाढले असून थेट ४२ कोटी ५९ लाख रुपयांवर गेले आहे.या प्रस्तावावर आयुक्तांनी त्यांचा अभिप्राय दिला आहे. फेरनिविदेनंतर प्राप्त झालेली निविदेतील रक्कम पूर्वीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे सदर प्रस्ताव महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ७३ (क) नुसार मंजूर केल्यास होणाºया जास्त खर्चाच्या रकमेस प्रशासन जबाबदार राहणार नाही व त्याची सर्वस्वी जबाबदारी तत्कालीन स्थायी समिती सदस्यांची राहील. सदर कामाची प्रचलित दराने सुधारित अंदाजपत्रकीय रक्कम ५० कोटी २७ लाख इतकी आहे. वरील सर्व बाबींचा विचार करून स्थायी समितीने योग्य निर्णय घ्यावा ही विनंती, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. यामुळे स्थायी समितीमध्ये नक्की काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई