शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणासाठी पालिका मुख्यालयासमोर धडकणार आंदोलक; वाहतुकीत बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 08:12 IST

Navi Mumbai : आज नेरुळ ते बेलापूर दरम्यानचा पामबीच मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. नेरुळ येथून केवळ आंदोलकांच्या गाड्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

नवी मुंबई - विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आज निघणाऱ्या मोर्चाला पोलीसांनी पामबीच मार्गावर पालिका मुख्यालयासमोरील जागा दिली आहे. त्यामुळे पामबीच मार्गावर नेरुळ ते. बेलापूर दरम्यान आंदोलक जमणार आहेत. यासाठी पामबीच मार्गावरील वाहतुकीत देखील बदल करण्यात आले आहेत.

आज नेरुळ ते बेलापूर दरम्यानचा पामबीच मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. नेरुळ येथून केवळ आंदोलकांच्या गाड्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. ही वाहने करावे गावापर्यंत जाऊ शकणार असून त्याठिकाणी त्यांच्या पार्किंगची व्यवस्था आंदोलनाच्या संयोजकांमार्फत करण्यात आलेली आहे. तर पामबीच मार्गे जाणारी इतर खासगी वाहने नेरुळ येथून राजीव गांधी पूल मार्गे एल. पी. पुलाकडे वळवली जाणार आहेत. 

या आंदोलनात नवी मुंबईसह पनवेल, उरण, कल्याण डोंबिवली, पालघर आदी परिसरातून 50 हजाराहून अधिक आंदोलक सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यांच्या वाहनांमुळे आज नवी मुंबईत जागोजागी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आवश्यक ठिकाणी वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त देखील नेमण्यात आला आहे.पालिका मुख्यालयासमोर धडकणार आंदोलक  पामबीच मार्गावरील वाहतुकीत बदल

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाAirportविमानतळ