शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

वाशीतील रुग्णालयावरील हल्ल्याचा निषेध, कडक कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 00:56 IST

Navi Mumbai News : कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्याऐवजी त्यांना मारहाण केली जाणार असेल, तर काम करायचे कसे, असा प्रश्न डॉक्टर्ससह इतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला असून, हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे

नवी मुंबई - महानगरपालिकेच्या वाशीतील कोरोना रुग्णालयातील हल्याचा सर्व स्तरांतून निषेध होत आहे. २२९ दिवस डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचारी कोरोनाग्रस्तांची सेवा करत आहेत. कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्याऐवजी त्यांना मारहाण केली जाणार असेल, तर काम करायचे कसे, असा प्रश्न डॉक्टर्ससह इतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला असून, हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.नवी मुंबईमध्ये १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. तेव्हापासून कोरोनामुक्त शहर करण्यासाठी आरोग्य यंत्रणा दिवस-रात्र काम करत आहे. मनुष्यबळ कमी असतानाही प्रत्येक रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मनपा व खासगी रुग्णालयांमधून आतापर्यंत ४३,८६९ रुणांना सेवा देण्यात आली आहे. तब्बल ४०,९५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के झाले आहे. मृत्युदर साडेतीन टक्क्यांवरून दोन टक्क्यांवर आला आहे. रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण १८६ दिवसांवर पोहोचले आहे. आरोग्यसेवकांनी केलेल्या परिश्रमांमुळे हे शक्य झाले आहे. अनेक डॉक्टर्स व इतर कर्मचारी सुट्टी न घेता काम करत आहेत, परंतु बुधवारी पहाटे वाशी रुग्णालयात झालेल्या हल्ल्यामुळे आरोग्यसेवकांना धक्का बसला आहे. काहीही दोष नसताना डेडिकेटेड कोविड रुग्णालयात तोडफोड करण्यात आली. आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. कामबंद आंदोलन करण्याची मानसिकताही काही कर्मचाऱ्यांची झाली होती, परंतु उपचार घेणाऱ्या रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आंदोलन केेले नाही.कर्मचारी संघटना व आरोग्य सेवेतील सर्वच कर्मचाऱ्यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दाल निषेध केला आहे. जर कोणाला उपचाराविषयी आक्षेप असतील किंवा काही त्रुटी असतील, तर त्याविषयी सनदशीर मार्गाने तक्रार नोंदविता येते. आंदोलनही करता येते, परंतु तोडफोड करणे योग्य नाही. या प्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.  

महानगरपालिका रुग्णालयातील हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी आम्ही पोलिसांकडे करणार आहोत. या प्रकरणाचा संघटनेच्या वतीने पाठपुरावा करणार आहोत.- मंगेश लाड, सरचिटणीस, समाज समता संघटना 

महानगरपालिकेचे डॉक्टर्स व सर्व आरोग्यसेवक दिवस-रात्र कोरोना रुग्णांना सेवा देत आहेत. त्यांच्यावरील हल्ल्याचा आम्ही निषध करत आहोत. या प्रकरणी दोषींना कडक शासन झालेच पाहिजे.-रमाकांत पाटील, कार्याध्यक्ष,नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियन

टॅग्स :hospitalहॉस्पिटलCrime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई