शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

सेंट जोसेफ शाळेवर महामोर्चा, पालकांचे ठिय्या आंदोलन, आयुक्तांनी दिला कारवाईचा इशारा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 06:40 IST

मनमानी कारभार करत पालक व विद्यार्थ्यांची पिळवणूक करणाºया नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ शाळेविरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी पालकांनी आंदोलन केले होते. शाळा प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे मोर्चाचे ठिय्या आंदोलनात रूपांतर झाले.

पनवेल : मनमानी कारभार करत पालक व विद्यार्थ्यांची पिळवणूक करणाºया नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ शाळेविरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी पालकांनी आंदोलन केले होते. शाळा प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे मोर्चाचे ठिय्या आंदोलनात रूपांतर झाले.वाढीव फीविरोधात पालकांनी आवाज उठवल्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास व कोणत्याही प्रकारचे संरक्षण न देण्याची मुजोरी शाळा प्रशासनाकडून वाढल्याने पालकांकडून आंदोलन पुकारण्यात आले. यावेळी आंदोलक व शाळा व्यवस्थापनामध्ये दोनदा चर्चा झाली, मात्र सायंकाळपर्यंत योग्य तोडगा निघाला नसल्याने मोर्चाचे स्वरूप ठिय्या आंदोलनात झाले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता. शाळा व्यवस्थापनाविरोधात निषेध व्यक्त करून जोरदार घोषणाबाजी केली. परिमंडळ २ चे उपायुक्त नवी मुंबई पोलीस राजेंद्र माने यांनीही या प्रकरणात मध्यस्थीचा प्रयत्न केला. मात्र रात्री उशिरापर्यंत काहीच तोडगा निघाला नव्हता.आंदोलनात भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विक्रांत पाटील, गटनेते परेश ठाकूर, ज्येष्ठ नेते रामदास शेवाळे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक जगदीश गायकवाड, नगरसेविका दर्शना भोईर, नगरसेवक संतोष शेट्टी, अनिल भगत, प्रकाश बिनेदार, अजय बहिरा, शत्रुघ्न काकडे, नगरसेविका मुग्धा लोंढे, सुशीला घरत, विद्या गायकवाड, रत्नप्रभा घरत, माजी नगरसेविका नीता माळी यांच्यासह पालक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.ंबैठकीत निघाला तोडगादिवसभर सुरु असलेल्या आंदोलनानंतर सायंकाळी उशिरा पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, शाळा प्रशासन, आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल आदींसह प्रमुख पदाधिकाºयांची बैठक पार पडली. आयुक्तांनी फी वाढीसंदर्भात ताशेरे ओढत विद्यार्थ्यांकडून प्रलंबित शुल्क हे कमाल १५ हजारापर्यंत घेण्यात यावे असे ठरले. परिवहन शुल्कातही वाढ करू नये, तीन वर्षांचा ताळेबंद आयुक्त कार्यालयाला मंगळवार, १९ सप्टेंबर रोजी सादर करण्याचे आदेश दिले. आदेशाची पायमल्ली केल्यास कारवाईचा इशारा दिला.दिवसभराच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. शाळा प्रशासनाला मागण्या मान्य कराव्या लागल्या आहेत. निर्देशाचे पालन केले नाही तर शाळेची मान्यता रद्द होणार आहे. आयुक्त तशा प्रकारचा प्रस्ताव देखील पुढे पाठवतील, आणि आपणही या संदर्भात नक्कीच पाठपुरावा करू.- प्रशांत ठाकूर,आमदार

टॅग्स :Schoolशाळा