ठाणे : मुरबाड, शहापूर या तालुका पातळीच्या दोन ग्रामपंचायतींना नुकताच नगरपंचायतीचा दर्जा मिळाला आहे. यामुळे ठाणे व पालघर जिल्ह्यांतील वाढत्या लोकसंख्येच्या निकषावर पात्र ठरलेल्या सुमारे ३३ ग्रामपंचायतींच्या नगर परिषद, नगरपंचायतींची घोषणा आता लांबणीवर गेल्याचे उघड झाले आहे.महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५मधील प्रकरण २नुसार २५ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती या नगरपालिका बनण्यास पात्र आहेत. तर, या अधिनियमामधील प्रकरण २६ नुसार १० हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींची नगरपंचायत होऊ शकते. या निकषाच्या आधारावर पालघर जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींसह भिवंडी तालुक्यातील १ आणि कल्याण तालुक्यातील सुमारे २ ग्रामपंचायती नगरपालिका बनवण्यास पात्र ठरल्या आहेत. याशिवाय, नगरपंचायतींसाठी २८ ग्रामपंचायती वाढीव लोकसंख्येच्या निकषावर पात्र ठरल्या आहेत. मात्र, तालुका पातळीच्या ग्रामपंचायतींनाच नगरपंचायती बनवून उर्वरित ३३ ग्रामपंचायतींची मात्र घोषणा करण्यात आली नाही. यासंदर्भातील आमदार, खासदारांच्या भूमिकेबाबत ग्रामीण भागांत आता तर्कवितर्क काढले जात आहेत. सरकारन ३५पैकी २ ग्रामपंचायतींच्या नगरपंचायती घोषित केल्यामुळे नाराजीत भर पडली आहे.च्कल्याण तालुक्यातील २७ गावांच्या नगरपालिकांसह उर्वरित पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींच्या नगरपंचायतींसाठी पालकमंत्री, आमदार, खासदारांच्या सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन जिल्हा परिषदेच्या व पंचायत समित्यांच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला. च्पण, आता या लोकप्रतिनिधींकडून त्यासाठी ठोस भूमिका घेण्यास विलंब होत असल्यामुळे संबंधित गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दोन ग्रामपंचायतींच्या नगरपंचायती घोषित केल्याने नाराजीत भर पडली आहे.
नगरपंचायतीचा दर्जा लांबणीवर
By admin | Updated: March 23, 2015 01:11 IST