शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांचा सिडकोवर मोर्चा, विमानतळबाधित ग्रामस्थ आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 00:22 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांनी आपल्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी सिडकोवर तिरडी मोर्चा काढला.

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांनी आपल्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी सिडकोवर तिरडी मोर्चा काढला. विमानतळ प्रकल्पासाठी आपली गावे आणि वडिलोपार्जित जमिनी देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाकडे सिडकोकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत शेकडो प्रकल्पग्रस्तांनी सिडकोच्या बेलापूर येथील कार्यालयावर हल्लाबोल केला.आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रकल्पपूर्व कामे वेगाने सुरू आहेत. २०२१ पर्यंत विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचा निर्धार सिडकोने केला आहे. विमानतळाच्या मार्गातील बहुतांशी अडथळे दूर झाले असले तरी प्रकल्पबाधित गावांचे काही प्रश्न अद्यापि धुमसत आहेत. त्यामुळे दहा गावांच्या स्थलांतराचा प्रश्न रखडला आहे. दहापैकी सहा गावांनी १०० टक्के स्थलांतर केले असले, तरी उर्वरित गणेशपुरी, उलवे तरघर व कोंबडभुजे या चार गावांतील काही ग्रामस्थ अद्यापि आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने त्यांनी स्थलांतराला विरोध दर्शविला आहे. याचा परिणाम म्हणून या गावांच्या गावठाणाबाहेरील बांधकामांना सिडकोने नोटिसा बजावल्या आहेत. ग्रामस्थांनी आपली बांधकामे स्वत:हून काढून टाकावीत, अन्यथा सिडकोच्या माध्यमातून ती पाडून टाकली जातील, असा इशारा या नोटिसाद्वारे देण्यात आला आहे. सिडकोच्या या भूमिकेचे तीव्र पडसाद या चार गावांतील ग्रामस्थांत उमटले आहेत. याचाच एक भाग म्हणून येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी तिरडी मोर्चा काढून सिडकोच्या उदासीनतेचा प्रतिकात्मक निषेध केला. मोर्चात चार गावांतील शेकडो प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते. विमानतळ प्रकल्पासाठी सिडकोने दहा गावांतील जमिनी संपादित केल्या आहेत. मात्र, पुनर्वसनाबाबत सिडकोकडून कार्यवाही होताना दिसत नाहीत. जाहीर केलेल्या पुनर्वसन पॅकेजमधील अनेक गोष्टींना बगल दिली जात आहे. ज्या गावांत मासेमारी केले जाते, त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापि अधांतरी आहे. उद्याने, क्रीडांगणे, शाळा, समाजमंदिरे, स्मशानभूमी आदी सुविधांबाबत सिडकोकडून कार्यवाही केली जात नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. प्रलंबित प्रश्न सोडविण्याऐवजी प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर कारवाईच्या हालचाली सुरू केल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.>वाघिवली गावाच्या स्थलांतराची घाई नाहीतरघर, कोंबडभुजे, उलवे, गणेशपुरी, वाघिवली वाडा, वरचे ओवळे, कोल्ही, कोपर आणि चिंचपाडा अशी स्थलांतरित झालेल्या नऊ गावांची नावे आहेत. या यादीतील वाघिवली हे दहावे गाव आहे. वाघिवली हे गाव विमानतळाच्या गाभा क्षेत्राबाहेर असल्याने त्याच्या स्थलांतराची सध्या सिडकोला घाई नाही, असे असले तरी या गावातील ग्रामस्थांनाही पुनर्वसन व पुन:स्थापना योजनेअंतर्गत भूखंड व इतर सुविधा देण्यात आल्या आहेत. भविष्यात वाघिवली गावाच्या ठिकाणी खारफुटीची लागवड करण्याची सिडकोची योजना आहे.>सिडकोच्या कारभाराचा प्रकल्पग्रस्तांना चांगलाच अनुभव आहे. ५० वर्षे उलटली तरी साडेबारा टक्के भूखंडांचे वाटप सुरूच आहे. सिडकोच्या या दिरंगाईचा फटका अनेक प्रकल्पग्रस्तांना बसला आहे. विमानतळबाधित गावांच्या पुनर्वसनावर अद्यापि कार्यवाही सुरू नाही. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ही वस्तुस्थिती असताना प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर कारवाई करण्याचा घाट सिडकोने घातला आहे. त्याचा निषेध म्हणून तिरडी मोर्चा काढण्यात आला आहे.- अ‍ॅड. प्रशांत भोईर,अध्यक्ष, नांदाई माता चार गाव पुनर्वसन समिती