शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिक गाळे, झोपड्या जमीनदोस्त, दोन दशकानंतर झाली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 23:37 IST

पनवेल शहरातील एसटी आगारासमोरील व्यावसायिक गाळे तब्बल दोन दशकांनंतर अखेर पनवेल महापालिकेने जमीनदोस्त केले.

पनवेल : पनवेल शहरातील एसटी आगारासमोरील व्यावसायिक गाळे तब्बल दोन दशकांनंतर अखेर पनवेल महापालिकेने जमीनदोस्त केले. नगरपरिषद अस्तित्वात असतानाही या ठिकाणी अनेक वेळा अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आल्या होत्या. मात्र, प्रत्येक वेळी राजकारण आडवे येत असल्याने कारवाई स्थगित करण्यात येत होती. बुधवारी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पालिका व पोलीस प्रशासनाच्या मोठ्या फौजफाट्यासह येथील झोपड्या हटविण्यात आल्या.पनवेल शहरातून गेलेल्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलाच्या दोन मार्गिका येथील लक्ष्मी वसाहत झोपडपट्टीमुळे रखडल्या आहेत. दोन आठवडाभरापूर्वी एमएसआरडीसीने येथील झोपडीधारकांना घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, येथील रहिवाशांनी घरे रिकामी करण्यास विरोध दर्शविला. यासंदर्भात आयुक्तांनी मध्यस्थीची भूमिका घेत झोपडीधारकांचे ट्रान्झिट कॅम्पमध्ये पुनर्वसन केल्याशिवाय झोपड्यांना हात लावणार नाही, अशी भूमिका घेतली. मात्र, झोपड्यांच्या नावाखाली सुरू असलेले व्यावसायिक गाळ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नसल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले होते. बुधवारी पनवेल रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता व आगारासमोरील मार्ग मोकळा करण्यात आला. कारवाईसाठी वेगवेगळी पाच पथके तयार करून टप्प्याटप्प्याने झोपड्या तोडण्यात आल्या. कारवाईला विरोध करणाऱ्यांना या वेळी ताब्यात घेण्यात आले.शहराच्या प्रवेशद्वाराजवळ मागील ५० वर्षांपासून सुरू असलेले हॉटेल सुभाष पंजाबही या वेळी जमीनदोस्त करण्यात आले. या ठिकाणी सुरू असलेली कारवाई थांबविण्यासाठी पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आयुक्त कारवाईवर ठाम असल्याने कारवाई सुरूच ठेवण्यात आली. या ठिकाणी सुमारे १३६ व्यावसायिक गाळे आहेत. झोपड्यांच्या नावाखाली या गाळ्यांमध्ये दुकाने थाटण्यात आली होती.पनवेल महापालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. आजतागायत झोपडपट्टींच्या आडून पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू आहे. मागील दहा वर्षांपासून झोपड्यांमुळे पंचायत समितीच्या इमारतीचे कामही रखडले होते. कारवाई वेळी १०० पेक्षा जास्त पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी उपस्थित होता. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त अशोक दुधे, पालिका उपायुक्त जमीर लेंगरेकर, पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते आदीसह मोठ्या प्रमाणात पालिका कर्मचारी, पोलीस उपस्थित होते.>कारवाईदरम्यान चाकू हल्ल्याचा प्रयत्नपनवेल एसटी स्टॅण्डसमोर कारवाई सुरू असताना एक माथेफिरू चाकू घेऊन कारवाईच्या ठिकाणी धावत आला होता. महिला पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते यांना या संदर्भात माहिती दिली.पोलिसांनी माथेफिरूला अटकाव करीत त्याच्याकडून चाकू हिसकावला. या घटनेमुळे घटनास्थळी खळबळ उडाली. किशोर मोकल असे माथेफिरू तरुणाचे नाव आहे. वेळेत संबंधिताना अटकाव केल्याने पुढील दुर्घटना टळली.>कारवाईदरम्यान झोपडीधारकांनी सहकार्य केले. झोपडीधारकांबद्दल सहानुभूती आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्यांना घरे मिळणार आहेत. तोपर्यंत आम्ही त्यांचे पुनर्वसन करणार आहोत. मात्र, या झोपडींच्या आडून सुरू असलेल्या व्यावसायिक गाळेधारकांना कदापि अभय दिले जाणार नाही.- गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल>शहरातून पनवेल रेल्वेस्थानकाकडे जाणारी वाहतूककोंडी ही प्रवाशांसाठी नित्याचीच होती. या ठिकाणच्या झोपडीदेखील कारवाईत हटविण्यात आल्या. या ठिकाणी रस्त्याचे काम पालिकेने सुरू केले आहे.>महामार्गावरील वाहतूक काही काळ बंदकळंबोली : झोपडपट्टीतील व्यावसायिक दुकानांवर बुधवारी महापालिकेने मोठ्या फौजफाट्यासह कारवाई केली. यामध्ये कोणताही अडथळा येऊ नये म्हणून पनवेल शहरातून जाणाºया मुंबई-गोवा राष्टÑीय महामार्गावरील वाहतूक काही वेळ थांबवण्यात आली होती. ती वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गाने वळवली. त्यामुळे वाहनचालकांची काही प्रमाणात गैरसोय झाली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ च्या बाजूला झोपडपट्ट्या आहेत. त्या हटविण्यासाठी महापालिकेचे दोनशे कर्मचारी, मोठा पोलीस फौजफाटा होता. त्यामुळे पनवेल बस स्टँडच्या समोर वाहतूककोंडी होऊ नये म्हणून पनवेल शहर वाहतूक शाखेने नवीन पनवेल सिग्नलपासून ते शिवशंभू नाका दरम्यान दोन्ही बाजूने वाहतूक बंद केली होती. मात्र, उड्डाणपुलावरून वाहनांची वर्दळ सुरू होती.