शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भाजी मार्केटला समस्यांचा विळखा, महापालिकेसह एपीएमसीचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 00:02 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केट परिसराला समस्यांचा विळखा पडला आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केट परिसराला समस्यांचा विळखा पडला आहे. मुख्य मार्केट व विस्तारित मार्केटच्या मध्ये रोडवरच कांदा-बटाट्याचा अवैधपणे व्यापार सुरू आहे. रोडवर कचऱ्याचे ढिगारे पडले आहेत. मोकळ्या भूखंडावर डेब्रिज टाकण्यास सुरुवात झाली असून या समस्येकडे महापालिकेसह एपीएमसी प्रशासन दुर्लक्ष करत आहे.एपीएमसीमधील सर्वाधिक समस्या भाजी व फळ मार्केट परिसरामध्ये आहेत. मुख्य व विस्तारित भाजी मार्केटला जोडण्यासाठी रोड तयार करण्यात आला आहे. या रोडचा वाहतुकीऐवजी अनधिकृत व्यापारासाठी वापर केला जात आहे. याठिकाणी अनधिकृतपणे कांदा व बटाट्याचा होलसेल व्यापार सुरू आहे. रोज सकाळी ५०० पेक्षा जास्त गोणींची येथे विक्री केली जात आहे. रोडच्या दोन्ही बाजूला कृषी माल ठेवला जात आहे. महापालिकेचे कार्यक्षेत्र असल्याचे कारण देऊन बाजार समिती काहीही कारवाई करत नाही. महापालिकेचे प्रशासन तक्रारी करूनही या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करत आहे. भाजीपाला घाऊक व्यापारी महासंघानेही याविषयी वारंवार तक्रारी दिल्या आहेत. परंतु या तक्रारींची फार गांभीर्याने दखल घेतली जात नाही. याच ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मध्यरात्रीनंतर दुपारी १२ वाजेपर्यंत अनेक फेरीवाले येथे व्यापार करत आहेत. येथील मुख्य रोडवरच मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. कचरा उचलण्याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करू लागले आहे. येथील मोकळ्या इमारतीमध्ये अनधिकृतपणे खानावळ सुरू असूनही त्यावर काहीही कारवाई केली जात नाही.भाजी मार्केटच्या बाहेरील उच्च विद्युतदाबाचा वीजवाहिन्या गेल्या आहेत. वीजवाहिन्यांच्या खालील जागा एपीएमसीला हस्तांतर करण्याची कार्यवाही सुरू आहे. या भूखंडावर काही दिवसांपासून अनधिकृतपणे डेब्रिजचा भराव केला जात आहे. या भूखंडाच्या कोपºयामध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. या बांधकामाचा वापर बेकायदेशीरपणे फेरीवाले करत आहेत.मार्केटमध्ये पाणीपुरवठा करणाºया विक्रेत्याने प्लॅस्टिकच्या मोठ्या कॅन ठेवण्याचे गोडाऊन तयार केले आहे. वास्तविक येथील अनधिकृत बांधकाम हटविण्याची आवश्यकता आहे. या परिसरामधील समस्या सोडविण्याकडे बाजार समितीचे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. महापालिकेचे अधिकारी व कर्मचारीही लक्ष देत नाहीत. यामुळे तक्रार करायची कोणाकडे, असा प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे.>अभय कोणाचे?मुख्य व विस्तारित भाजी मार्केटमध्ये अनधिकृत व्यापार सुरू आहे. रोडवर कचºयाचे ढीग साचले आहेत. गुटखा विक्रेते व इतर फेरीवाल्यांनी मोकळ्या इमारतीचा ताबा घेतला आहे. याविषयी तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने संबंधितांना नक्की अभय कोणाचे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :onionकांदा