शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

वसाहतीअंतर्गत रस्त्यावरील कोंडीचा प्रश्न कायम, महापालिका हतबल, शहरवासीयांची डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 00:32 IST

Navi Mumbai News : नवी मुंबईची लोकसंख्या वाढत आहे. रोजगाराच्या विपुल संधी उपलब्ध झाल्याने विविध प्रांतातील नोकरदारांचा या शहराकडे ओढा वाढत आहे. त्यामुळे येथील पायाभूत सुविधांवर ताण पडत आहे. 

नवी मुंबई : माहिती व तंत्रज्ञानाचे शहर म्हणून नावारूपाला येणाऱ्या नवी मुंबईची लोकसंख्या वाढत आहे. रोजगाराच्या विपुल संधी उपलब्ध झाल्याने विविध प्रांतातील नोकरदारांचा या शहराकडे ओढा वाढत आहे. त्यामुळे येथील पायाभूत सुविधांवर ताण पडत आहे. सुनियोजित शहरातील रस्ते, उद्याने व इतर अत्यावश्यक सेवा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. शहराची उभारणी करताना वाहनतळाचे नियोजन करण्याचे राहून गेले. त्याचा त्रास आता शहरवासीयांना सहन करावा लागत आहे. कारण उपलब्ध रस्ते आणि वाहनतळाच्या जागा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीची कायमस्वरूपी समस्या शहरवासीयांना भेटसावत आहे. या समस्येवर मात करणे महापालिका प्रशासनाला अद्याप तरी फारसे यश आलेले नाही.सिडकोने सुनियोजित असे नवी मुंबई शहर उभारले. वेगवेगळ्या नोडसमध्ये शहराची आखणी करण्यात आली. शहराचे नियोजन करताना संबंधित नोडसमधील वीस वर्षांनंतरची लोकसंख्या गृहित धरून पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या, परंतु कालांतराने सिडकोचे हे नियोजत पुरते फसल्याचे स्पष्ट झाले आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर येथील वाहनांची संख्याही वाढली. त्यामुळे रस्ते आणि पार्किंगच्या सुविधांचा पुरता बोजवरा उडाला आहे. विशेषत: वसाहतीअंतर्गच्या अरुंद रस्त्यावर वाहतूककोंडीची कायमस्वरूपी समस्या भेडसावत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी महापालिकेकडून विविध योजना तयार करण्यात आल्या. गृहनिर्माण सोसायटीतील वाहनधारकांनी आपली वाहने सोसायटीच्या आवारातच उभी करण्याचे फर्मान सोडण्यात आले. वसाहतीअंतर्गत रस्त्यावर वाहने पार्क करण्यास मज्जाव करण्यात आला. सम-विषम पार्किंगचा पर्यायही देण्यात आला. हे आदेश न जुमानणाऱ्या वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून कारवाईचा बडगाही उगारण्यात आला, परंतु वाहतूककोंडीची समस्या मात्र जैसे थे राहिली. आजतागायत ही समस्या कायम असून, भविष्यात ती अधिक गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.एपीएमसीची वाहने वसाहतीततुर्भे येथील एपीएमसी मार्केटमध्ये दिवसाला कृषिमालाची शेकडो ट्रक व इतर वाहने येतात. मार्केटमध्ये रिकामी केल्यानंतर ही वाहने जागा मिळेल, तेथे पार्क केली जातात. मार्केट परिसरातच भव्य ट्रक टर्मिनल असतानाही अनेक वाहनधारक वसाहतीअंतर्गच्या छोट्या रस्त्यांवर आपले ट्रक आणि टेम्पो उभे करतात. 

खासगी वाहनांना पदपथ आंदणखासगी बसेस, रिक्षा, टेम्पो, तसेच टुरिस्टच्या वाहनांना शहरातील रस्ते व पदपथ आंदण दिल्यासारखी परिस्थती आहे. शहरात ठिकठिकाणी खासगी बसेस व मालवाहू टेम्पोच्या रांगा लागलेल्या दिसून येतात. वाहतूक विभागाचे या प्रकाराकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. 

दुतर्फा पार्किंगचा फटकाप्रमुख रस्त्यांसह दळणवळणाचे मुख्य साधन असलेल्या वसाहतीअंतर्गत रस्त्यांवर दुतर्फा वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे अगोदरच अरुंद असलेले रस्ते आणखी निमुळते होत असल्याने वाहतूककोंडीचा नेहमीच सामना करावा लागतो. विशेषत: संबंधित विभागातील विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठी अडचण होत आहे. 

वाहतूक पोलिसांची तारांबळनोकरी-व्यवसायानिमित्त शेजारच्या शहरातून नवी मुंबईत येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या वाहनांचा ताणही नवी मुंबईतील उपलब्ध रस्ते आणि वाहनताळाच्या अपुऱ्या सुविधांवर पडत आहे. अशा परिस्थितीत वाहतुकीचे नियमन करताना वाहतूक पोलिसांची तारांबळ उडताना दिसत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईParkingपार्किंगNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका