शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतील विकासकामांचे पंतप्रधान करणार लोकार्पण; सी-लिंकसह नेरूळ - उरण रेल्वे मार्ग अन् दिघा स्थानकाचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 14:24 IST

मार्चमध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याअगोदर पायाभूत सुविधांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण करण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. 

नवी मुंबई : एमएमआरडीएचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवडी-न्हावा-शेवा सी लिंकसहचे नवी मुंबईतील नेरूळ-उरण रेल्वेचा दुसरा टप्पा आणि दिघा रेल्वेस्थानकाचे फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सिडकोने तयारी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेवर नियोजित कार्यक्रमांच्या दृष्टीने पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सिडकोने प्रस्ताव मागविले आहेत.

मार्चमध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याअगोदर पायाभूत सुविधांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण करण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. 

शिवडी-न्हावा-शेवा-सी लिंकचे काम पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे नेरूळ-उरण लोकल मार्गावरील खारकोपर ते उरण हा दुसरा टप्पासुद्धा प्रवासी वाहतुकीस सज्ज आहे. दिघा रेल्वेस्थानक मागील तीन महिन्यांपासून प्रवाशांच्या प्रतीक्षेत आहे. या प्रमुख विकास प्रकल्पांसह एमएमआर क्षेत्रातील इतर विविध प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याची योजना आहे. 

कार्यक्रमाचा खर्च पावणेतीन कोटीया नियोजित कार्यक्रमाची तयारी करण्याचे निर्देश सिडकोच्या संबंधित विभागाला प्राप्त झालेत. त्यानुसार सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेवर कार्यक्रमाच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. या नियोजित कामांत  प्रवेश, निर्गमन आणि अंतर्गत रस्त्यांचा समावेश आहे. त्यासाठी २ कोटी ६५ लाख ७१ हजार ७८६ रुपये खर्च अपेक्षित धरला आहे. विशेष म्हणजे हे काम पूर्ण करण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNavi Mumbaiनवी मुंबईBJPभाजपा