लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव/ मुरुड : मुरुड नगरसेवकपदाची प्रभाग क्र मांक ७ (अ) साठी अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी पोटनिवडणूक नुकतीच संपन्न झाली होती. या निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रांजली मकू यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने ही निवडणूक बिनविरोध जाहीर करण्यात आली. मुरुड नगरपरिषदेमध्ये शिवसेनेचे वर्चस्व असून शिवसेनेचा नगराध्यक्ष व नऊ नगरसेवक आहेत. तर शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आय व राष्ट्रवादी पक्ष मिळून आघाडीचे सहा नगरसेवक होते. आता त्यामध्ये एका नगरसेवकाची भर पडून आघाडीची संख्या सात झाली आहे. यामध्ये स्वीकृत नगरसेवकांची संख्या एक- एकने सुद्धा वाढलेली आहे.नवनिर्वाचित नगरसेविका प्रांजली चेतन मकू या उच्च विद्याविभूषित आहेत. त्या अनुसूचित जमाती प्रवर्गामधून बिनविरोध निवडून आल्या आहे. त्यांना सोमवारी मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या दालनात नगरसेवक पदाचे प्रमाणपत्र मुख्याधिकारी गोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस मनोज भगत, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर, नगरसेवक आशिष दिवेकर, कोळी समाज अध्यक्ष मनोहर बैले, मनोहर मकू आदी उपस्थित होते. यावेळी तालुका चिटणीस मनोज भगत यांनी प्रांजली मकू यांनी शेकापच्या एबी फॉर्मवर अर्ज दाखल केल्याने त्या शेकापच्या अधिकृत उमेदवार असल्याचे सांगितले. अनुसूचित जमातीसाठी मुरुड नगरपरिषदेमध्ये दोन जागा आरक्षित होत्या. त्यामध्ये पुरु ष व महिलेसाठी जागा आरक्षित होती. सध्या ही जागा भरल्यामुळे मुरु ड नगरपरिषदेच्या १७ जागा परिपूर्ण झाल्या आहेत. या नगरपरिषदेची कोणतीही जागा शिल्लक नसल्याचे मुख्याधिकारी गोरे यांनी सांगितले.
नगरसेवकपदी प्रांजली मकू बिनविरोध
By admin | Updated: May 30, 2017 06:25 IST