शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
3
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
4
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
5
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
6
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
7
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
8
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
9
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
10
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
11
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
12
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
13
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
14
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
15
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
16
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
17
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
18
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
19
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...

प्रधानमंत्री आवास योजनेस एकनाथ शिंदे सरकारचा खो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 07:00 IST

पनवेलवासीयांचे घराचे स्वप्न लांबणीवर

नारायण जाधवनवी मुंबई : सर्वांसाठी घरे या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या संकल्पनेच्या आधारे पनवेल महापालिका पहिल्या टप्प्यात बांधत असलेल्या सुमारे ७८९ घरांच्या बांधकामास एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या द्विसदस्यीय मंत्रिमंडळाने स्थगिती दिली आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार महापालिकेने याबाबतच्या निविदांना तत्काळ स्थगिती दिल्याने शहरांतील गरिबांचे घरांचे स्वप्न लांबणीवर पडले आहे. 

पनवेल महापालिका तीन प्रकल्पात जवळपास ३,९०० घरांची निर्मिती करणार आहे. यातील २,०६२ घरे झोपडपट्टीवासीयांना मिळणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात कच्छी मोहल्ला, पटेल मोहल्ला आणि तिसऱ्या टप्प्यात अशोक बाग, तक्का वसाहतीसह इंदिरा नगर या झोपडपट्टीमधील रहिवाशांचे पुनर्वसन होणार आहे. 

पहिल्या टप्प्यातील निविदा १२० कोटींची यातील पहिल्या टप्प्यातील प्रकल्पासाठी १२०.३६ कोटी रुपयांची निविदा महापालिकेने काढली होती. परंतु, शिंदे  सरकारच्या निर्देशानुसार महापालिकेने तिला १९ जुलै २०२२ रोजी तत्काळ स्थगिती दिली. पहिल्या टप्प्यात ७८९ घरांमध्ये झोपडपट्टीवासीयांसह १७४ अत्यल्प व १५० अल्प उत्पन्न गटातील शहरी गरजूंनाही घरे २०२२ ते २०२५ पर्यंत दिली जाणार होती. मात्र,त्यांचे घरांचे स्वप्न आता लांबणीवर पडले आहे. 

 येथे होणार घरेवाल्मिकीनगर,महाकालीनगर येथील भूखंड व पनवेल शहरातील टपाल नाका येथील मोकळ्या भूखंडावर प्रधानमंत्री आवाज योजनेंतर्गत त्यांची निर्मिती केली जाणार होती. ३० स्क्वेअर मीटर (एडब्ल्यूएस), ४५ स्क्वेअर मीटर (एलआयजी) स्वरुपाची ही घरे असणार होती. 

पनवेलचीही निवडपनवेल शहराची २००१ ची लोकसंख्या १ लाख ४ हजार होती. २०११ पर्यंत ती ५ लाख ९ हजार ९०१ वर जाऊन पोहोचली आहे. यापैकी ८ हजार ९७० इतकी कुटुंबे म्हणजेच ४४ हजार ८५० इतकी लोकसंख्या झोपडपट्टीत राहते. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्रातील इतर शहरांप्रमाणेच पनवेल महापालिकेचीही निवड झाली आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना