शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटी २०३० पर्यंत होणार मेगा पोर्ट विकास; केंद्रीय मंत्री सोनोवाल यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 07:02 IST

मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सोनोवाल हे पहिल्यांदाच जेएनपीटी बंदराच्या भेटीवर आले होते.

उरण : विविध विकासकामांमध्ये प्रगती करून आणि बहुविध पायाभूत सुविधा विकसित करून देशाच्या बंदर आधारित औद्योगिक विकासाचे नेतृत्व करत जेएनपीटी २०३० पर्यंत एक मेगा पोर्ट म्हणून विकसित होईल. सार्वजनिक-खासगी क्षेत्राच्या भागीदारीमुळे देशाच्या सागरी क्षेत्राच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास केंद्रीय बंदरे, नौकानयन आणि जलमार्ग व आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला.मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सोनोवाल हे पहिल्यांदाच जेएनपीटी बंदराच्या भेटीवर आले होते. भेटीदरम्यान त्यांनी बंदराच्या कामकाजाची, बंदरातील पायाभूत सुविधांची, बंदराने केलेल्या तांत्रिक प्रगतीचीही माहिती घेतली तसेच सार्वजनिक-खासगी क्षेत्राच्या भागीदारीमुळे जेएनपीटी बंदराने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला व जेएनपीटीच्या प्रमुख भागीदारांशीही संवाद साधला.सोनोवाल यांनी २१० कोटी खर्चाच्या करळ जंक्शन ते जेएनपीटी पोर्ट रोड काँक्रीटीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन केले तसेच जेएनपीटीच्या अत्याधुनिक सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझातील अत्याधुनिक सोयीसुविधांचा आढावा घेण्यासाठी पार्किंग प्लाझाच्या कमांड सेंटरला भेट दिली. याशिवाय त्यांनी सागरी पुरवठा साखळीतील अविभाज्य भाग असलेल्या कंटेनर ट्रकचालकांशीही संवाद साधला. जीटीआय हाउसमधील टर्मिनल कामकाजाचा आढावा घेतला तसेच प्रत्यक्ष जहाजावर जाऊन कामाची पाहणी केली. त्यानंतर जेएनपीटीच्या बहु-उत्पादन सेझ आणि हिंद टर्मिनल सीएफएसला भेट दिली. खासगी बीएमसीटीपीएलने हाती घेतलेल्या ‘स्मार्ट पोर्ट इनिशिएटिव्ह’चा व दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराच्या प्रगतीचा आढावा घेतला. जेएनपीटी टाऊनशिपमध्ये उभारण्यात आलेल्या ३५० प्रति मिनिट निर्मितीच्या ऑक्सिजन जनरेटिंग प्लांटचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.जेएनपीटीने नुकतीच सुरू केलेली ‘ड्वार्फ कंटेनर ट्रेन’ सेवा वाढवणे, बंदराची सद्य:स्थिती तसेच जेएनपीटीच्या इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांसह ‘व्यवसाय सुलभीकरणा’साठी जेएनपीटीने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी मंत्र्यांना दिली. याप्रसंगी जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ, मुख्य वरिष्ठ प्रबंधक जयंत ढवळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :JNPTजेएनपीटी