शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

Maharashtra Election 2019: शेवटच्या दिवशी उमेदवारांचे भरपावसात शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 06:35 IST

 रॅलीपेक्षा मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीला प्राधान्य

नवी मुंबई : नवी मुंबई : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पहाटेपासून पाऊस सुरू झाल्यामुळे उमेदवारांसह कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडल्याचे चित्र शहरात पाहावयास मिळाले. पावसामुळे भव्य रॅली काढून प्रचाराची सांगता करण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटीगाठीवर भर देण्यात आला. पावसामुळे अनेक कार्यकर्ते घराबाहेरही पडले नाहीत. प्रचाराच्या तोफा थंडावल्यामुळे आता सर्वांची भिस्त छुपा प्रचार व भेटीगाठीवर असणार आहे.

प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रमुख उमेदवार रॅलीचे आयोजन करून शक्तिप्रदर्शन करत असतात. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो; परंतु शनिवारी पहाटेपासूनच शहरात पावसाने हजेरी लावली. दिवसभर सातत्याने पाऊस पडत होता. नेरुळमध्ये राज ठाकरे यांच्या सभेसाठी घातलेल्या सभामंडपामध्येही पाणी ठिपकू लागले होते.

ऐरोली मतदारसंघामध्ये बहुतांश सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी रॅली ऐवजी प्रत्यक्ष पदाधिकारी व नागरिकांच्या भेटीला प्राधान्य दिले होते. भाजपनेही मोठ्या रॅलीचे आयोजन केले नाही. पाऊस पडत असल्यामुळे महापालिका क्षेत्रातील १११ प्रभागांमधील कार्यकर्त्यांनीही रॅलीऐवजी प्रत्यक्ष भेटून व समाजमाध्यमांवरून मेसेज टाकण्यावरच भर दिल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. याशिवाय उमेदवारांकडून सोशल मीडियावरही प्रचार सुरू आहे. केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या माध्यमाचा पुरेपुर वापर केलाजात आहे.

आता उमेदवारांचा भर छुप्या प्रचारावर शनिवारी सांयकाळी प्रचार संपला, त्यामुळे उर्वरित २४ तासांत उमेदवारांकडून छुप्या प्रचारावर भर दिला जाणार आहे. यात प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका, प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची फोडाफोडी, मतदार याद्यांची विभागनिहाय छाननी, प्रमुख कार्यकर्त्यांना जबाबदारीचे वाटप, मतदारयादीत नाव असलेल्या; परंतु निवासाचा पत्ता बदलेल्या स्थलांतरित मतदारांचा शोध घेणे आदी घडामोडींना वेग येणार आहे. असे असले तरी या काळात मतदारांना प्रलोभन दाखविणे, पैसे व इतर भेटवस्तूंचे वाटप आदी शक्यता नाकारता येत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोग सतर्क झाला आहे.

रबाळेमध्ये मद्यसाठा जप्त

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. १८ आॅक्टोबरला रात्री विष्णूनगरकडे जाणाऱ्या रोडवर पोलिसांना नगरसेवक असे लिहिलेली बीएमडब्ल्यू कार सापडली. त्यावर नवी मुंबई महानगरपालिकेचा लोगो लावण्यात आला होता. या कारमध्ये ३,८४० रुपये किमतीच्या बीअरच्या बॉटल व ३,६०० रुपये किमतीच्या मद्याच्या बॉटल सापडल्या आहेत. या प्रकरणी वाहनचालक आर. व्ही. पवार याच्यावर रबाळे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रॅली, पदयात्रा, बैठकांवर भरनवी मुंबई : शनिवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी बहुतांशी उमेदवारांनी आपापल्या परीने शक्तिप्रदर्शन करीत मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न केला. बेलापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी रॅलीच्या माध्यमातून प्रचाराची सांगता केली, तर राष्ट्रवादीचे अशोक गावडे यांनी शुक्रवारी रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. मनसेचे उमेदवार गजानन काळे यांनी शेवटच्या दिवशी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा घेऊन मतदारांना गोंजारण्याचा प्रयत्न केला.

बेलापूर मतदारसंघात १७ उमेदवार रिंगणात आहेत. यातील भाजपच्या मंदा म्हात्रे, राष्ट्रवादीचे अशोक गावडे आणि मनसेचे गजानन काळे यांच्यातच खरी लढत असणार आहे. त्यामुळे या तिन्ही उमेदवारांनी शेवटच्या टप्प्यात आक्रमक प्रचारावर भर दिला. प्रचार रॅली, पदयात्रा, सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठका आदीच्या माध्यमातून मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची एकमेव सभा वगळता बेलापूरमध्ये एकाही बड्या नेत्यांची सभा झाली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. तर राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी छोटेखानी सभा घेऊन भाजप उमेदवारासाठी मतदारांकडे साकडे घातले. शनिवारी प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने सर्वच उमेदवारांनी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019ElectionनिवडणूकVotingमतदान