शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

१७ ग्रामपंचायतीतील सत्ता संघर्ष टिपेला; गाव कारभारी कोण याचा फैसला मतपेटीत बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2022 22:04 IST

राजकीय पक्षांनी ध्येय धोरणे पायदळी: तत्व, निष्ठेलाही तिलांजली; अभद्र युती-आघाड्यामुळे मतदार संभ्रमात  

मधुकर ठाकूर

उरण : आगामी होऊ घातलेल्या झेडपी,पंचायत समिती,नगरपरिषद निवडणुकीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी (१८) मतदान होत आहेत. १७ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी विविध राजकीय पक्षांचे ५३ तर १७ ग्रामपंचायतीच्या १५१ सदस्य पदासाठी ३७१ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.

राजकीय पक्षात कुणाचा पायपोस कुणालाच उरलेला नाही. सत्ता हेच प्रमुख उद्दिष्ट असलेल्या विविध प्रमुख राजकीय पक्षांनी ध्येय धोरणे, तत्व, निष्ठेला तिलांजली दिली आहे. कमरेचे गुंडाळून अभद्र युती-आघाड्या करत सत्तेसाठी एकत्र येऊन निवडणूक लढवित आहेत.काही ग्रामपंचायतींमध्ये तर भाजप- सेना-शेकाप, कॉंग्रेस- राष्ट्रवादी एकत्रित येऊन अपक्ष-गावआघाडी विरोधात निवडणूक लढवित आहेत.तर काही ग्रामपंचायतींमध्ये फायदा होईल त्या पक्षाशी संधान बांधून निवडणूक लढविल्या जात आहेत.

बाहेर परस्परांविरोधात गलिच्छ आरोप करणारे राजकीय पक्ष सत्तेसाठी लाचारी पत्करत एकत्र येऊन निवडणूक लढवित असल्याचे विदारक चित्र सध्या तालुक्यात दिसत आहेत.या अभद्र राजकीय युती-आघाड्यांमुळे मात्र मतदार चांगलेच संभ्रमात सापडले आहेत. 

उरण तालुक्यातील १७ ग्रामपंचायती

ग्रामपंचायत  प्रभाग  सदस्य उमेदवार  मतदार  नाव.         संख्या  संख्या  संख्या   संख्या 

पाणजे -        ०३      ०७     २१        ११८२डोंगरी-         ०३      ०७      १५        १२३१रानसई -        ०३      ०७      १४           ९८५पुनाडे-           ०३      ०७      १४           ९५८सारडे-           ०३      ०७       १७         १३३३नवीनशेवा-     ०३      ०९       ३१          २१३६ धुतुम-           ०३       ०९      १८           १७१७करळ-           ०३       ०९      २१          १३१५कळंबुसरे-      ०३       ०९     १९           १६८७बोकडविरा-    ०३        ०९     २६           २१४२वशेणी-         ०३        ०९     १९         ३०१६पागोटे-          ०३        ०९      १८         ११५६पिरकोन-       ०४         ११     २२          ३१३२जसखार-       ०४         ११     ३१        १९९१चिर्ले -          ०४         ११      २६         २७५८भेंडखळ-       ०४         ११      ३४        २६३०नवघर -         ०५         १५       २५       २२८४

ग्रामपंचायती -१७प्रभाग संख्या--- ५७ सदस्य संख्या -१५१ सदस्यपदासाठी निवडणूकीच्या रिंगणातील एकूण उमेदवार -३७१.सरपंच  संख्या -१७.सरपंच पदासाठी निवडणूकीच्या रिंगणातील एकूण उमेदवार -५३.

बिनविरोध - घारापुरी - सरपंच-०१, सदस्य-०७, नवघर-४,पुनाडे-१,भेंडखळ-१एकूण सरपंच-०१, सदस्य -१३.

एकूण मतदार---३१६५३.स्त्री --१६३८४.पुरुष --१५१६८.घारापुरी वगळून 

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप,सेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आदी प्रमुख राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते, पुढारी,आजी-माजी आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी आदी सर्वांचीच प्रतिष्ठापणाला लागली आहे.  

१७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पदाच्या उध्दव ठाकरे शिवसेना-१२ लढवित असल्याचे तालुका अध्यक्ष संतोष ठाकूर यांनी दिली.  शेकापही सहा ग्रामपंचायत सरपंचपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरली असल्याची माहिती तालुका चिटणीस विकास नाईक यांनी दिली. कॉंग्रेस सरपंच पदासाठी सहा ग्रामपंचायत लढत असल्याचे तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी दिली. सरपंच पदासाठी राष्ट्रवादी एकही जागा लढवित नसल्याचे तालुका अध्यक्ष मनोज भगत यांनी सांगितले.तर भाजपचे तालुकाध्यक्ष रवी भोईर यांनी याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली.

सरळ लढती : डोंगरी,रानसई,पुनाडे,धुतुम,कळंबुसरे,वशेणी, पागोटे,पिरकोन,नवघर.तिरंगी: पाणजे,सारडे,करळ,बोकडवीरा, जसखार, चिर्ले, भेंडखळ.चौरंगी: नवीन शेवा

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :uran-acउरणElectionनिवडणूक