शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वाशी पुलाच्या डागडुजीचं काम पुढे ढकललं, 1 फेब्रुवारीपासून असा करा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 09:26 IST

नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी सोमवारी एक अहवाल जाहीर करून वाशी पुलाच्या डागडुजीचं काम पुढे ढकललं असल्याची माहिती दिली आहे.

नवी मुंबई- नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी सोमवारी एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करून वाशी पुलाच्या डागडुजीचं काम पुढे ढकललं असल्याची माहिती दिली आहे. पुलाच्या दुरूस्तीच्या तारखांमध्ये बदल झालेला असून आज (ता- 23 जानेवारी) सुरू होणार काम आता 1 फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. 1 फेब्रुवारी रोजी पुलाच्या दुरूस्तीचं काम सुरू होणार असून हे काम 21 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. याआधी 23 जानेवारी ते 12 फेब्रुवारीपर्यंत पूल वाहतुकीसाठी बंद राहणार होता. पण आता वाहतूक विभागाने पुलाच्या दुरूस्तीचं काम एक आठवड्यासाठी पुढे ढकललं आहे.  सार्वजनिक बांधकाम विभाग 1 फेब्रुवारीला रात्री 1 वाजता पुलाचं काम सुरू करणार असून ते काम 21 फेब्रुवारीच्या मध्यरात्री पर्यंत चालणार आहे. 

सायन-पनवेल मार्गावरील नव्या वाशी खाडी पुलावर मुंबईहून पुणे तसंच गोव्याला ये-जा करणाऱ्या वाहनांचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वाहतुकीचे प्रमाण जास्त असलेल्या या मार्गावरील वाशी खाडी पुलाच्या लोखंडी जॉइंडरची झीज झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतलं आहे.

पुलाची दुरूस्ती सुरू असताना 20 दिवस पूल वाहतुकीसाठी बंद राहील. त्यामुळे गाड्यांची वाहतूक इतर मार्गिकेवरून वळविण्यात आली आहे.

असा करा प्रवास ?- नवी मुंबईहून मुंबईकडे येण्यासाठी मुंबई-वाशी लेनचा वापर करा.- मुंबईहून नवी मुंबईकडे जाणारी वाहतूक जुन्या वाशी पुलावरून वळविण्यात आली आहे.- जूना वाशी पूल चारचाकी गाड्या, हलव्या मोटार गाड्या आणि आप्तकालिन गाड्यासाठी (अॅम्ब्युलन्स, काही बसेस) खूला असेल. जड वाहनांना या पुलावरून प्रवास करता येणार नाही. - जड वाहनांना ऐरोली पुलावरून प्रवास करता येईल. - नवी मुंबईकडे जाणाऱ्या जड वाहनांना इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून जाऊन, विक्रोळी मार्गे ऐरोली टोल नाका असा प्रवास करावा लागेल. - जुन्या खाडी पुलावर अवजड वाहनांना बंदी असल्यामुळे मुंबईबाहेर जाणारी आवजड वाहतूक मानखुर्द येथून घाटकोपर लिंक रोडवरून ऐरोली-दिवा पुलावरून पटनी रोड व त्यापुढे ठाणे-बेलापूर मार्गावरून पुढे जाण्यासाठी पार्यायी मार्ग ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMumbaiमुंबई