नवी मुंबई : दिघा येथील नगरसेवक नवीन गवते, अपर्णा गवते व दीपा गवते यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. अनधिकृत बांधकामांचा ठपका असल्याने ही कारवाई करण्यात आली असून यामुळे राष्ट्रवादी काँगे्रसला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. दिघा येथील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न राज्यभर गाजत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर येथील ९९ इमारतींवर कारवाई सुरू झाली आहे. काही इमारती पाडण्यात आल्या असून उर्वरित बांधकामांना तात्पुरता दिलासा मिळालेला नाही. अनधिकृत बांधकाम प्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक नवीन मोरेश्वर गवते व नगरसेविका दीपा गवते यांचे पती राजेश गवते यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. याशिवाय गवते कुटुंबीयांचे निवासस्थान असलेले श्री मोरेश्वर अपार्टमेंटही अनधिकृत असून याप्रकरणी अपर्णा व नवीन गवते यांच्यासह दीपा गवते यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी पालिका आयुक्तांनी निर्णय घ्यावा असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी २९ एप्रिलला सुनावणी आयोजित केली होती. परंतु दरम्यान त्यांची बदली झाल्यामुळे सुनावणी स्थगित झाली होती. नवीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तीनही नगरसेवकांची सुनावणी घेतली होती. नगरसेवकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली होती. यानंतर उपलब्ध कागदपत्रे व नगरसेवकांनी मांडलेली भूमिका व दिलेली कागदपत्रे यांची शहानिशा करून अखेर २६ जुलैला तीनही नगरसेवकांचे पद रद्द केले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँगे्रसला पुन्हा धक्का बसला आहे. यापूर्वी नेरूळमध्ये पोटनिवडणूक लागली होती. (प्रतिनिधी)राजकीय समीकरणे बदलणारगवते कुटुंबीयांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने भविष्यात पालिकेतील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. स्पष्ट बहुमत नसल्याने राष्ट्रवादीने काँगे्रस व अपक्षांच्या मदतीने सत्ता टिकविली आहे. सद्य:स्थितीमध्ये अपक्ष महापौर, काँगे्रसचा उपमहापौर व शिवसेनेचा स्थायी समिती सभापती अशी स्थिती आहे. सत्ता असूनही एकही महत्त्वाचे पद राष्ट्रवादीकडे नाही.
दिघ्यात तीन नगरसेवकांचे पद रद्द
By admin | Updated: July 27, 2016 03:22 IST