शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

राष्ट्रवादीच्या ३ नगरसेवकांचे पद धोक्यात

By admin | Updated: May 2, 2016 02:19 IST

अतिक्रमण प्रकरणी राष्ट्रवादी काँगे्रसच्या तीन नगरसेवकांना पद का रद्द करू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आयुक्तांची बदली झाल्याने २९ एप्रिलला

नवी मुंबई : अतिक्रमण प्रकरणी राष्ट्रवादी काँगे्रसच्या तीन नगरसेवकांना पद का रद्द करू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आयुक्तांची बदली झाल्याने २९ एप्रिलला होणारी सुनावणी पुढे ढकलली असून नवीन आयुक्त काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवी मुंबई महापालिकेमधील राष्ट्रवादी व शिवसेनेच्या जवळपास ८ सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार लटकली आहे. जवळपास चार नगरसेवकांवर अतिक्रमणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. काही जणांचे जातप्रमाणपत्र वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. जातप्रमाणपत्र बनावट असल्याप्रकरणी प्रतिस्पर्धी उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिघा परिसरातील नगरसेवक नवीन गवते, अपर्णा गवते व दीपा गवते यांच्यावरही अतिक्रमणाचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे अशी तक्रारही करण्यात आली होती. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पालिका प्रशासनाने या तीनही नगरसेवकांना तुमचे नगरसेवक पद का रद्द करू नये अशी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. २९ एप्रिलला आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे सुनावणी होणार होती. परंतु आयुक्तांचीच बदली झाल्यामुळे सुनावणी होवू शकली नाही. महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झालेले तुकाराम मुंडे हे सोमवारी पदभार स्वीकारणार आहेत. आता या नगरसेवकांची सुनावणी ते कधी घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दिनेश वाघमारे यांनी जाता - जाता राष्ट्रवादीला धक्का दिल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. परंतु प्रशासनाने अशाप्रकारे कोणालाही धक्का देण्यासाठी ही नोटीस दिलेली नाही. सर्व प्रक्रिया पार पाडून गत आठवड्यात नोटीस दिली होती व त्यावर सुनावणीही घेण्यात येणार होती, असे सांगितले आहे. दिघा व ऐरोली परिसरातील शिवसेनेच्याही दोन नगरसेवकांवर अतिक्रमणाचा ठपका आहे. एक नगरसेवकावर गुन्हा दाखल झाला असून राष्ट्रवादीच्या सदस्यांवर कारवाई झाली तर शिवसेनेवर कारवाई करण्यासाठीही हालचाली होण्याची चर्चा सुरू झाली आहे.