शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खारघर, तळोजा परिसरातील प्रदूषणाचा विषय पेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 23:48 IST

Pollution : गेल्या तीन वर्षांपासून खारघर तळोजा कॉलनी वेल्फेअर असोसिएशन प्रदूषणमुक्त वातावरणासाठी अतोनात संघर्ष करीत आहे.

पनवेल - गेल्या तीन वर्षांपासून खारघर तळोजा कॉलनी वेल्फेअर असोसिएशन प्रदूषणमुक्त वातावरणासाठी अतोनात संघर्ष करीत आहे. सामान्य हितसंबंधांच्या मुद्द्यांकरिता लढण्यासाठी, एकत्र आलेल्या शंभराहून अधिक सोसायट्यांचा समूह असलेल्या या संस्थेने गेल्या दोन वर्षांत अत्यंत नामांकित प्रयोगशाळांसह हवेच्या गुणवत्तेची चाचणी केली आणि आपण ज्या परिसरात राहतो तेथील हवा प्रदूषित आहे असा निष्कर्ष निघाला. मात्र याबाबत काहीच कारवाई होत नसल्याने एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केटीसीडब्लूए या संस्थेने सहायक पोलीस आयुक्तांकडे केली आहे.एक वर्षाआधी संस्थेने बेलापूर एमपीसीबीच्या कार्यालयासमोर मोर्चा काढला होता. या दरम्यान आंदोलनकाऱ्यांना, एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु आजतागायत तळोजा एमआयडीसी येथील कारखान्यांमधून वाढणाऱ्या वायुप्रदूषणाची पातळी वाढत असून योग्य कारवाई केली जात नसल्याचा आरोप संस्थेचे अध्यक्ष मंगेश रनावडे यांनी केला आहे. या वाढत्या वायुप्रदूषणामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना आणि रुग्णांना श्वसनाच्या आणि डोकेदुखीच्या तक्रारी वाढत आहेत. केटीसीडब्ल्यूचे अध्यक्ष मंगेश रानवडे आणि उपाध्यक्ष इम्तियाज शेख यांनी संपूर्ण केटीसीडब्ल्यूए टीम समवेत अतिरिक्त आयुक्त बी.जी. शेखर यांच्या कार्यालयाला भेट दिली आणि प्रदूषणाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल एमपीसीबी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.काही दिवसांपूर्वी खारघर शहरात वातावरण फाउंडेशनने लावलेल्या कुत्रिम फुप्फुसांचे रंग अवघ्या दहा दिवसात काळवंडले होते. खारघर-तळोजा-पनवेल परिसरातील लोक दिवसांतून जवळपास १७ तास प्रदूषित हवेत श्वास घेतात. या भागातल्या हवेत सकाळी ६ ते ८ या वेळात पर्टिक्युलर मॅटर पोल्युटंट म्हणजेच पीएम २.५ हा घटक सर्वाधिक असतो, हे अभ्यासाअंती स्पष्ट झाले होते.  

टॅग्स :pollutionप्रदूषणpanvelपनवेलNavi Mumbaiनवी मुंबई