शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

जॉगिंग ट्रॅकवर एसीचे प्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 11:08 PM

घणसोलीतील प्रकार : अतिक्रमण विरोधी पथकाची डोळेझाक

नवी मुंबई : पालिकेने बनवलेल्या जॉगिंग ट्रॅकवरच एसीची आउटडोअर युनिट बसवण्यात आली आहेत, यामुळे जॉगिंग ट्रॅकवर फेरफटका मारणाऱ्यांना तिथल्या दूषित हवेला सामोरे जावे लागत आहे, तर सोसायटीच्या भिंतीमधून सार्वजनिक जागेवर बसवलेल्या या एसीच्या युनिटवर कारवाई करण्याकडे अतिक्रमण विरोधी पथकाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

पालिकेने घणसोली येथे कोट्यवधी रुपये खर्चून सेंट्रल पार्क उभारले आहे. या पार्कच्या भोवती नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक बनवण्यात आला आहे. सदर पार्कचे अद्याप उद्घाटन झालेले नसले, तरीही जॉगिंग ट्रॅकचा मात्र नागरिकांकडून वापर सुरू झाला आहे. सकाळ-संध्याकाळ त्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक फेरफटका मारण्यासाठी येत असतात. या जॉगिंग ट्रॅकभोवती पालिकेने आकर्षक हिरवळही तयार केली आहे. अशातच जॉगिंग ट्रॅकचा शोभा घालवणारा, तसेच फेरफटका मारण्यासाठी आलेल्यांना तिथले एसीचे युनिट त्रासदायक ठरू लागले आहेत. पार्कच्या प्रवेशद्वाराच्याच बाजूला असलेल्या रहिवासी सोसायटीत मागच्या बाजूस एसीचे आउटडोअर युनिट बसवण्यात आले आहेत, तर काही हॉटेल व्यावसायिकांनी त्यांच्या स्वयंपाक खोलीच्या धुरांडीची तोंडेही जॉगिंग ट्रॅकच्या दिशेनेच केली आहेत. यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ध्वनी तसेच वायुप्रदूषण होत आहे. विशेष म्हणजे, पार्कमध्ये ज्या बाजूला तरणतलाव बनवलेला आहे, त्यापासून काही अंतरावरच जॉगिंग ट्रॅकवर हा प्रकार पाहायला मिळत आहे.

परिणामी, एसी व धुरांडी यातून निघणाºया दूषित हवेचा त्रास तिथे येणाऱ्यांना सहन करावा लागणार आहे. जॉगिंग ट्रॅकला लागूनच असलेल्या भिंतीवर रहिवासी सोसायट्यांमधील वाढीव बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे जॉगिंग ट्रॅक बनवताना ही अतिक्रमणे असतानाही त्यावर कारवाई का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर संपूर्ण प्रकारावरून जॉगिंग ट्रॅक बनवताना पालिकेचेही नियोजन फसल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.पालिकेने घणसोलीत सेंट्रल पार्कच्या बाहेर बनवलेला जॉगिंग ट्रॅक नागरिकांना उपयुक्त ठरत आहे. मात्र, काही ठिकाणी रहिवासी सोसायट्यांच्या एसीचे आउटडोअर युनिट जॉगिंग ट्रॅकच्या भिंतीवर बसवण्यात आले आहेत. त्यामधून निघणारी गरम हवा व दूषित वायूचा त्रास जॉगिंगसाठी आलेल्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्याकडे पालिकेने लक्ष देऊन ते हटवण्याची गरज आहे.

- अभिजीत पाटील, स्थानिक नागरिक