शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

उरण, पनवेलमध्ये शांततेत मतदान

By admin | Updated: February 22, 2017 07:09 IST

पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी रिंगणात असलेल्या ६२ उमेदवारांचे

पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी रिंगणात असलेल्या ६२ उमेदवारांचे तर उरणमधील ४३ उमेदवारांचे भवितव्य मंगळवारी मतदान यंत्रात बंद झाले आहे. पनवेल तालुक्यात शांततेत सरासरी ८० टक्के मतदान झाले, तर उरणमध्ये सुमारे ६५ टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी मतदान केंद्राच्या बाहेर झालेले किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. २३ फेब्रुवारीला मतमोजणी होणार असल्याने आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. उरणमध्ये  ४३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीतउरण : तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेच्या चार आणि पंचायत समितीच्या आठ अशा १२ जागांसाठी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५६.८४ टक्के मतदान झाले. मतदानाची अंतिम टक्केवारी ६५ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. शांततेत पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत ४३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मंगळवारी मतपेटीत बंद झाले आहे. त्यामुळे आता सर्वांनाच गुरुवारी (२३) होणाऱ्या निकालाची प्रतीक्षा राहिली आहे.उरण तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदानाची सर्वत्रच सकाळपासूनच धामधूम सुरू झाली होती. सर्वच राजकीय पक्षांचे नेते, पुढारी, उमेदवार आणि त्यांचे समर्थक सकाळपासूनच कामाला लागले होते. मतदानासाठी विविध मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदान केंद्राबाहेर सर्वत्र राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी लगबग सुरू झाली होती. सकाळपासून मतदानाला झालेली गर्दी दुपारी १ वाजल्यानंतर ओसरल्याचे चित्र दिसून आले. त्यानंतर मतदानाचा जोर वाढला. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५५,०९५ मतदारांनी मतदान केले. त्यामध्ये २८,३४० स्त्री आणि २६,७५५ पुरुष मतदारांचा समावेश होता. दुपारपर्यंत ५६.८४ टक्के मतदान झाले होते. (वार्ताहर) पनवेलमध्ये उशिरापर्यंत मतदानपनवेल : तालुक्यात सायंकाळी ५.३० ही मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदारांच्या रांगा लागून होत्या. त्यामुळे येथे उशिरापर्यंत मतदान घेण्यात आले. या निवडणुकीने ग्रामीण भागात प्रचंड उत्साह दिसून आला. पनवेलमधून जिल्हा परिषदेच्या आठ गणांसाठी व पंचायत समितीच्या १६ गणांसाठी शांततेत मतदान पार पडले. या वेळी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. मतदान करण्यासाठी जनजागृती करण्यात आल्याने मतदानात वाढ झाली. शेकाप राष्ट्रवादी आघाडी सत्तेवर येते की, भाजपा-शिवसेना सत्ता खेचून घेते हे २३ फेब्रुवारीला समजणार आहे. वावंजे, नेरे, पाली देवद, पळस्पे, गुळसुंदे, वडघर, गव्हाण, केळवणे हे जिल्हा परिषद गण, तर वावंजे, चिंध्रण, नेरे, आदई, पाली देवद, विचुंबे, पळस्पे, कोन, पोयंजे, गुळसुंदे, करंजाडे, वडघर, वहाळ, गव्हाण, केळवणे,आपटा या पंचायत समितीच्या गणांमध्ये २२० केंद्रावर मतदान घेण्यात आले. यासाठी २००हून अधिक पोलीस, तर १५००हून जास्त सरकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. सर्वच मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. संपूर्ण पनवेल तालुक्यात शांततेत मतदान पार पडले. कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त राजेंद्र माने यांनी दिली.पनवेल तालुक्यात दुपारी ३.३०पर्यंत ६६.२२ टक्के मतदान झाल्याची माहिती पनवेल तालुका जिल्हा परिषद निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ८ जागांसाठी २३, तर पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात आहेत. पंचायत समितीसाठी भाजपा १४, सेना ८, शेकापक्ष ११, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ४ व अपक्ष २ उमेदवार रिंगणात आहेत. विचुंबे, देवद, आदई येथे मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. इमारतीतील मतदार उदासीनच्जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकरिता घेण्यात आलेल्या मतदानाकडे इमारतीमधील नागरिकांनी पाठ फिरवली. करंजाडे, उलवे या सिडको वसाहती सुध्दा गण आणि गटात आहेत. मात्र बिल्डिंगमधील अनेक मतदार खाली उतरले नाहीत. त्यांच्याकरिता बाहेर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते ठाण मांडून होते. परंतु अनेकांनी मतदान न करता घरातून काढता पाय घेतला. च्आपण मतदान केले नाही तर समोरच्यांना जाब विचारण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यामुळे मतदान केले असल्याचे शरद माने यांनी सांगितले. च्महापालिकेत आपला परिसर वर्ग न झाल्याची नाराजी त्यांच्यात अप्रत्यक्ष दिसून आली.