शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

उरण तालुक्यात सहा ग्रामपंचायतींत ७० जागांवर मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 00:33 IST

उरण तालुक्यातील तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे. उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाणजे, केगाव, नागाव, म्हातवली आदी चार ग्रामपंचायती येत आहेत.

मधुकर ठाकूर

उरण : उरण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या ७० जागांसाठी शुक्रवारी निवडणूक होत आहे. निवडणुकीच्या रिंगणात १६६ उमेदवार आहेत. बहुतांश ठिकाणी भाजपविरोधात महाआघाडीच्या उमेदवारांमध्येच खरी लढत पाहायला मिळणार आहे. तालुक्यातील चाणजे, केगाव, नागाव, म्हातवली, फुंडे, वेश्वी या सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान साहित्यांचे वाटप करण्यात आले. पोलीस बंदोबस्तात मतदान साहित्य मतदान केंद्रावर पोहोचविण्यात आले आहे.

उरण तालुक्यातील तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे. उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाणजे, केगाव, नागाव, म्हातवली आदी चार ग्रामपंचायती येत आहेत. या चार ग्रामपंचायतींच्या मतदानासाठी पोलीस निरीक्षक-२, अधिकारी-१४ आणि कर्मचारी- ८४ असा बंदोबस्त नियुक्त करण्यात आला असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी दिली. न्हावा-शेवा बंदर पोलीस ठाण्याअंतर्गत फुंडे या एकमेव ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणूक बंदोबस्तासाठी पोलीस निरीक्षक-२, अधिकारी-३ आणि कर्मचारी- १६ असा बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती न्हावा-शेवा बंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिली. मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केगाव या एकमेव ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणूक बंदोबस्तासाठी पोलीस निरीक्षक-१, अधिकारी-३ आणि कर्मचारी-२५ असा बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपन शिंदे यांनी दिली.

मतदान केंद्रावर कोविडचा फैलाव होणार नाही याची काळजी घेण्यासाठी सामाजिक अंतरासह मास्क व इतर आवश्यक सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय मतदारांनी मोठ्या संख्येने निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. तसेच खबरदारीची उपाययोजना म्हणून तलाठी, ग्रामसेवक यांची गस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत. ग्रामपंचायतनिहाय मतमोजणीसाठीही सहा टेबल लावण्यात येणार आहेत.    - भाऊसाहेब अंधारे, तहसीलदार, उरण

ग्रामपंचायतींची संख्या    ६प्रभाग    २५उमेदवार     ७०एकूण मतदार     ३१३०१

पुरुष    १५६१५स्त्रिया    १५६८८इतर    ०१एकूण मतदान केंद्र    ४३

टॅग्स :ElectionनिवडणूकNavi Mumbaiनवी मुंबई