शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

82 हजार बालकांना आज पोलिओ डोस, नवी मुंबईत ७३८ बुथवर व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 02:11 IST

Navi Mumbai News : पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी महानगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे. रविवारी शहरातील तब्बल ८६ हजार ८५५ मुलांना लस देण्यात येणार आहे.

नवी मुंबई - पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी महानगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे. रविवारी शहरातील तब्बल ८६ हजार ८५५ मुलांना लस देण्यात येणार आहे. यासाठी ७३८ बुथवर व्यवस्था करण्यात आली असून, यासाठी २ हजारपेक्षा जास्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. महानगरपालिकेकडे १ लाख २० हजार डोस उपलब्ध झाले आहेत.‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ या घोषवाक्यासह महानगरपालिकेने शहरभर लसीकरणासाठी जनजागृती केली आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रात ५ लाख ५३ हजार ४९८ घरांची नोंद आहे. शहरातील प्रत्येक मुलाला लस उपलब्ध व्हावी यासाठी मनपाचा प्रयत्न आहे. प्रत्येक घरापर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी ७६० पथके तयार केली होती.  त्यावर लक्ष ठेवण्यासाठी १६० पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील काही दिवसांमध्ये ८०० बॅनर, ३ हजार पोस्टर्सच्या माध्यमातून शहरभर जागृती करण्यात आली आहे. सर्व नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातूनही लसीकरणाची माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातील ८६,८५५ जणांना लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय काळजी घ्यायची याविषयी सूचनाही देण्यात आल्या आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेने पोलिओ लसीकरण अभियान प्रत्येक वेळी प्रभावीपणे राबविले आहे. या वेळीही ते यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व काळजी घेतली आहे. कोविड काळात पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. याकरिता घरोघरी, एसटी स्टॅण्ड, मुख्य चौक आदी ठिकाणी मोबाइल पथक हे डोस देणार आहेत.पोलिओ लसीकरणासाठी आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारीही घेतली असून कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षणही दिले आहे. प्रत्येक मुलाला लस मिळेल अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे.- डॉ. रत्नप्रभा चव्हाण, नोडल अधिकारी महानगरपालिका

टॅग्स :Healthआरोग्यNavi Mumbaiनवी मुंबई