शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महिलांसाठीच्या योजना कागदावरच, पोलिसांचे सावली केंद्र बंदच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 00:25 IST

शासकीय व निमशासकीय कार्यालयांसह शहरामध्ये महिलांसाठीच्या अनेक योजना कागदावरच असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

नवी मुंबई : शासकीय व निमशासकीय कार्यालयांसह शहरामध्ये महिलांसाठीच्या अनेक योजना कागदावरच असल्याचे चित्र दिसू लागले आहे. पोलिसांचे नेरुळमधील सावली हे महिला आधारकेंद्रही बंदच आहे. अनेक ठिकाणी महिला विश्रांतीकक्ष फक्त नावापुरतेच असल्याचे निदर्शनास आले आहे.नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये महिला आधारकेंद्र सुरू करण्यासाठी सिडकोने नेरुळमध्ये भूखंड उपलब्ध करून दिला आहे. २००३ मध्ये तत्कालीन पोलीस महासंचालक सुभाष मल्होत्रा यांच्या हस्ते या केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. यानंतर एप्रिल २००३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते कोनशीला समारंभ करून, इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. या इमारतीमध्ये महिला पोलीस कल्याण केंद्र सुरू करण्यात आले होते; परंतु हे केंद्र अनेक महिन्यांपासून बंद आहे. महिलांसाठी उभारलेल्या इमारतीचा काहीही उपयोग केला जात नाही. विद्यमान आयुक्त संजय कुमार यांनी इमारतीची व परिसराची साफसफाई करून घेतली. दिवसभर बंदोबस्तासाठी एक कर्मचारीही नियुक्त केला आहे; पण अद्याप या इमारतीचा वापर केला जात नाही. सद्यस्थितीमध्ये एनआरआयसह काही प्रमुख पोलीस स्टेशनमध्ये महिला विश्रांतीकक्ष तयार केला आहे; पण वाहतूक पोलीस चौक्यांच्या ठिकाणी महिलांसाठी विश्रांतीकक्षच नाही. यामुळे बंदोबस्तावर असलेल्या महिला कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या कोकण भवनमध्ये महिला विश्रांतीकक्ष कुठे आहे, याची माहिती अनेकांना नाही. या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र भोजनकक्ष तयार केला आहे; पण या कक्षामध्ये वॉशबेसीनमधील पाणी जमिनीवर सांडलेले असून, त्याची योग्यपद्धतीने साफसफाई केली जात नाही.नवी मुंबई महानगरपालिकेने २०० कोटी रुपये खर्च करून मुख्यालयाची उभारणी केली आहे. तळमजल्यावर महिला विश्रांतीकक्षही सुरू केला आहे; पण हा कक्ष बहुतांश वेळी बंदच असतो. महिला कर्मचाऱ्यांना त्याचा फारसा वापर करता येत नाही. काही महिला कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, प्रवेशद्वारावर कक्षाची चावी दिलेली असते. त्या ठिकाणी या कक्षाचा वापर कोणी व कधी केला, याची नोंदही ठेवली जाते; पण प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली असता प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकांना याची काहीच माहिती नसल्याचे स्पष्ट झाले. पालिकेच्या इतर कार्यालयांमध्येही महिलांसाठी भोजन व विश्रांतीकक्ष नाही. पालिकेचे विस्तीर्ण कँटीन असून, तेथेही महिलांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नाही. मुंबई बाजार समितीच्या मुख्यालयामध्ये महिला विश्रांतीकक्ष आहे.।प्रसाधनगृहांमध्ये पैसेवसुलीरेल्वे स्टेशन, बसडेपो व इतर ठिकाणी प्रसाधनगृहचालकांनी महिलांकडून पैसे घेऊ नये, असा नियम आहे; परंतु प्रत्यक्षात या नियमांची अंमलबजावणी केली जात नाही. अनेक ठिकाणी पैसे वसूल केले जात आहेत. तक्रार करूनही त्यामध्ये सुधारणा होत नाही. प्रसाधनगृहचालकांकडून तक्रारवहीही उपलब्ध करून दिली जात नाही.विश्रांतीकक्ष व इतर सुविधांची वस्तुस्थितीनेरुळमध्ये महिलांसाठी बांधलेल्या सावली आधारकेंद्राच्या इमारतीचा वापर नाहीप्रमुख वाहतूक चौक्यांमध्ये महिला कर्मचाºयांसाठी कक्ष नाहीतपालिका मुख्यालयामधील महिला विश्रांतीकक्षही बहुतांश वेळा बंदचमहिला विश्रांतीकक्षाचा वापर शिबिर व इतर उपक्रमांसाठीचपालिका मुख्यालयामध्ये महिलांसाठी स्वतंत्र भोजनकक्षही नाहीकोकण भवनमधील महिला विश्रांतीकक्षाची कर्मचाºयांनाही माहिती नाहीकोकण भवनमधील भोजनकक्षामध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्षबाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये महिला विश्रांतीकक्ष नाहीतसाफसफाई कर्मचाºयांसाठीची हजेरी शेड बंद असल्याने कर्मचाºयांची गैरसोय

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनWomenमहिला