शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तीन अधिकाऱ्यांना राष्टÑपती पदक, उपआयुक्त सुरेश मेंगडे यांचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 03:51 IST

पोलीस आयुक्तालयातीन तीन अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक घोषित झाले आहे.

नवी मुंबई : पोलीस आयुक्तालयातीन तीन अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक घोषित झाले आहे. त्यामध्ये उपआयुक्त सुरेश मेंगडे यांच्यासह सहायक आयुक्त किरण पाटील व वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांचा समावेश आहे.उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिसांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित केले जाते. त्यानुसार बुधवारी घोषित करण्यात आलेल्या यादीमध्ये नवी मुंबईतील तीन पोलीस अधिका-यांचा समावेश आहे. त्यामध्ये पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे, सहायक आयुक्त किरण पाटील व वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांचा समावेश आहे. मेंगडे यांनी नागरी हक्क संरक्षण विभागात असताना त्या विभागाचा चेहरा मोहरा बदलला. त्याकरिता राज्यभरात पोलिसांसह नागरिकांच्याही कार्यशाळा घेण्यात आल्या. दलित-सवर्णमध्ये असलेली दरी मिटवण्यासाठी त्यांनी या विभागामार्फत पुरेपूर प्रयत्न केले. तर अत्याचारांच्या गुन्ह्यातील शिक्षेचे प्रमाण वाढवण्यासाठी जुन्या जजमेंट तपासून त्यातील सुधाराच्या अनुषंगाने पोलिसांनाही मार्गदर्शन केले. त्यांनी यापूर्वीही नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात काम केले असून, या दरम्यान त्यांनी शहरातील गुन्हेगारीला आळा घातला होता. त्याकरिता सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांना अधिकाधिक शिक्षा लागेल या अनुषंगाने तपासावर भर दिला होता. तर शहरातील भिकाºयांची समस्या निकाली काढण्यासाठी त्यांची धरपकड करून बेगर्स होममध्ये रवानगी करण्याची मोहीम राबवली होती.सहायक आयुक्त किरण पाटील यांनी मागील कार्यकाळात तपासाच्या अनुषंगाने मोलाची कामगिरी केलेली आहे. गुन्ह्यांची उकल करण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांच्याकडून पोलिसांना मार्गदर्शन सुरू असते. त्याचप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांना २०१२ मध्ये पोलीस महासंचालक यांच्या सन्मानचिन्हाने गौरविण्यात आले आहे. त्यांनी कोपरखैरणे पोलीसठाण्यात कार्यरत असताना गुन्हेगारांवर कायद्याचा धाक निर्माण केला होता. तर जनतेमध्ये पोलिसांची प्रतिमा सुधारण्याचाही प्रयत्न केला. यादरम्यान काही सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाईच्या उद्देशाने त्यांना तडीपार करण्यासंबंधीचा अहवाल करून तो वरिष्ठांकडे सोपवला. यामुळे गोमांस विक्रेते, फसवणूक अशा गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा झाली आहे.

टॅग्स :Policeपोलिस