शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आंदोलन हाताळण्यात पोलिसांचेही अपयश; गोपनीय शाखेचाही जनतेशी संवाद तुटतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 04:00 IST

मराठा आंदोलनादरम्यान सर्वात मोठा उद्रेक नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात झाला. आंदोलकांनी चौकी व वाहनांची जाळपोळ करून पोलिसांनाही जखमी केले.

- नामदेव मोरेनवी मुंबई : मराठा आंदोलनादरम्यान सर्वात मोठा उद्रेक नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात झाला. आंदोलकांनी चौकी व वाहनांची जाळपोळ करून पोलिसांनाही जखमी केले. शांततेमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचा अचानक भडका उडेल, याचा अंदाज पोलीस यंत्रणेला आला नाही. वरिष्ठांकडून वेळेत ठोस उपाययोजना झाल्या नसल्याने मोठा उद्रेक झाला. पहिल्या दिवशीची स्थिती हाताळण्यात यंत्रणेला अपयश आले असून, वरिष्ठांच्या फसलेल्या रणनीतीबरोबर गोपनीय शाखेच्या जनतेशी तुटत चाललेल्या संवादामुळे ही स्थिती ओढवल्याचेही मानले जात आहे.मराठा क्रांती मोर्चाची आतापर्यंतची सर्व आंदोलने राज्यातील इतर शहरांप्रमाणे नवी मुंबईमध्येही शांततेमध्ये पार पडली. २५ जुलैच्या बंदची रणनीती ठरविण्यासाठी एक दिवस अगोदर माथाडी भवनमध्ये समाजाच्या सर्व संघटना व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. बंद शांततेमध्ये पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले. समन्वय समितीने त्यांची नावे व मोबाइलनंबरसह पत्रक सोशल मीडियावरून सर्व समाजबांधवांपर्यंत पोहोचविण्यास सुरुवात केली होती. वाशीतील शिवाजी चौकात काही वेळ रास्ता रोको किंवा जास्तीत जास्त पोलिसांच्या सहमतीने काही वेळ महामार्ग रोखण्याचे निश्चित करण्यात आले होते. पनवेलमध्येही अशाच पद्धतीने शांततेमध्ये आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले होते. सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून शांततेमध्येच आंदोलन सुरू झाले होते. दोन्ही महानगरांमध्ये दुपारपर्यंत आंदोलन शांततेमध्येच सुरू होते; परंतु दुपारनंतर आंदोलन उग्र होऊ लागले. महामार्गासह अंतर्गत रोडवरही आंदोलकांनी ठिय्या मांडला. सर्वच रस्ते, ट्रान्सहार्बर मार्ग रोखल्यामुळे शहरवासीयांची कोंडी होऊ लागली. आंदोलकांकडून व कोंडी झालेल्या शहरवासीयांकडून सोशल मीडियावर भडक प्रतिक्रिया उमटू लागल्या. आंदोलनामध्ये नेहमीच्या कार्यकर्त्यांची जागा नव्याने आलेल्या जमावाने घेण्यास सुरुवात केली, यामध्ये काही समाजकंटक घुसल्याची चर्चाही सुरू झाली. या सर्व गोष्टींचे गांभीर्य यंत्रणेला वेळेत आले नाही.दुपारनंतर आंदोलक आक्रमक होत गेले व त्यांना वेळेत शांत करण्यात पोलीस यंत्रणेला अपयश आले. दुपारनंतर परिस्थिती हाताबाहेर गेली. आंदोलक व पोलिसांमध्ये चकमक होऊ लागली. कळंबोलीमध्ये पोलीस उपआयुक्तांसह अनेक कर्मचारी जखमी झाले. पोलीस व्हॅन जाळण्यात आली. कोपरखैरणे परिसरामध्येही वरिष्ठ पोलीस अधिकाºयांसह कर्मचारी जखमी झाले. पोलीस चौकी जाळण्याचा प्रयत्न झाला. राज्यात सर्वात मोठा भडका नवी मुंबईमध्ये उडाला. आंदोलनाला वेगळी दिशा मिळत असल्याचे उशिरा पोलिसांच्या लक्षात आले किंवा वेळेत लक्षात आले; पण उपाययोजना उशिरा करण्यात आल्या. उशिरा लाठीचार्ज, अश्रुधुरांचा मारा व इतर कडक उपाययोजना करण्यात आल्या व त्यानंतर परिस्थिती नियंत्रणामध्ये येऊ लागली. इंटरनेट सेवा बंद करण्यापासून सर्व उपाययोजना केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणामध्ये येऊ शकली. पोलिसांना आंदोलनाच्या व्याप्तीचा व दुपारनंतर सोशल मीडियातून सुरू झालेल्या भडकावू संदेशांचा वेळेत अंदाज आला असता, तर कदाचित भडका उडालाच नसता.पोलीस आयुक्तांच्याबदलीची पुन्हा चर्चामराठा आंदोलनाचा नवी मुंबई व पनवेलमध्ये भडका उडाला. पोलिसांनी चांगली कामगिरी केली. एखाद्या गुन्ह्याचा उलगडा केला की सर्वांचे कौतुक होते. त्याप्रमाणे एखादा गंभीर गुन्हा किंवा घटना झाल्यानंतर तत्काळ टीकाही सुरू होते. पहिल्या दिवशी आंदोलन हाताळण्यात पोलीस अपयशी ठरल्याची चर्चा होऊ लागली असून, सहाजिकच टीकाही होऊ लागली आहे. या टीकेबरोबरच पोलीसआयुक्त हेमंत नगराळे यांच्या बदलीची व बढतीची चर्चाही सुरू झाली आहे. गृहविभागाने राज्यातील पोलीस अधीक्षक व उपआयुक्त दर्जाच्या ९५ अधिकाºयांच्या बदल्या केल्या असून, नवी मुंबईमधील दोन उपआयुक्तांचीही बदली करण्यात आली आहे. नगराळे यांचीही बदली होण्याची चर्चा सुरू झाली आहे. या वेळी त्यांची बदली होणार की पूर्वीप्रमाणे चर्चा हवेत विरणार, याकडेही शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.दंगल नियंत्रणाची यंत्रणा कुठे होतीशहरामध्ये मोठे सण, उत्सव व निवडणुका असल्या की पोलीस रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स, दंगा नियंत्रण पथके तैनात करते. कोणत्याही बंदच्या दरम्यान ही सर्व यंत्रणा शहरात सर्वत्र दिसत असते. या वेळीही ती यंत्रणा असली तरी तिचा प्रभाव सायंकाळपर्यंत फारसा जाणवला नाही. अनेक शहरवासी ही यंत्रणा कुठे होती, असा प्रश्न उपस्थित करू लागले आहेत.नेरुळ पोलिसांची दक्षताआंदोलनादिवशी नेरुळमध्येही दोन हजारांचा जमाव रेल्वे स्टेशनसमोर जमा झाला होता.रेल्वे रोको करण्यासाठी स्टेशनमध्ये घुसण्याच्या स्थितीमध्ये असताना पोलीस अधिकाºयांनी जमावाला थांबविले.आंदोलनामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. रेल्वे अडविल्यास त्यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल होऊन आयुष्यभर परिणाम सहन करावे लागतील, हे निदर्शनास आणून दिले. यामुळे रेल्वे रोको रोखण्यात यश आले व महामार्गासह पाम बीचवरील आंदोलनही शांततेमध्ये पार पडले.शहरात वाशी व इतर ठिकाणीही पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आंदोलन हाताळले.सायंकाळनंतर यंत्रणा दक्षदुपारनंतर आंदोलक आक्रमक झाले; पण त्यांना शांत करण्यात पोलीस अपयशी ठरले. सायंकाळी कोपरखैरणेमध्ये चौकीसमोरच जाळपोळ झाल्यानंतर व तुफान दगडफेकीनंतर यंत्रणा खडबडून जागी झाली. जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दिवसभराची स्थिती हाताळण्यात अपयश आलेल्या पोलिसांनी रात्रीची गंभीर स्थिती व्यवस्थित हाताळली. इंटरनेट सुविधा बंद करण्याचा अत्यंत चांगला निर्णय घेतला. तणाव असलेल्या परिसरामध्ये पोलीस परेड काढण्यात आली. कडक उपाययोजना करण्यात आल्या. दुसºया दिवशी स्वत: पोलीसआयुक्त हेमंत नगराळे कोपरखैरणे व इतर ठिकाणी परिस्थिती हाताळताना दिसत होते. अतितणावाची स्थितीही यंत्रणेने कुशलतेने हाताळली; पण पहिल्या दिवशी तेवढी दक्षता का दिसली नाही, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :PoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबई