शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनी बिद्रे प्रकरणातील आरोपींना 19 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 16:15 IST

नवी मुंबई- अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदकर आणि राजू पाटील यांना 19 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नवी मुंबई- अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदकर आणि राजू पाटील यांना 19 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पनवेल न्यायालयात आज सुनावणी झाली आहे. न्यायालयानं दोन्ही आरोपींना 19 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पनवेल पोलिसांनी डीएनए चाचणीसाठी अश्विनीच्या मुलीच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत. या प्रकरणात जळगावमधल्या ज्ञानदेव दत्तात्रेय पाटील ऊर्फ राजू पाटील याला कळंबोली पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद केला आहे. गेल्या सुनावणीत न्यायालयानं राजू पाटीलला 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. 364, 323, 497, 506 (2) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ज्ञानदेव ऊर्फ राजू पाटील हा एकनाथ खडसे यांचा भाचा असल्याची माहिती समोर आली होती. अश्विनी बिद्रे यांच्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत असताना यातील नेमके धागेदोरे शोधण्यासाठी पोलिसांना मोठे आव्हान उभे असताना ज्ञानदेव पाटीलसारखा आरोपी ताब्यात घेण्यात पोलिसांना मोठे यश आलं होतं.अश्विनी बिद्रे प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याच्या मोबाईल संभाषणाचे रेकॉर्ड पोलिसांना प्राप्त झालेलं असून, या अनुषंगाने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ज्या दिवशी अश्विनी बिद्रे या बेपत्ता झाल्या व त्यांचे शेवटचे असलेले लोकेशनवरून त्यावेळी अभय कुरुंदकरने ज्ञानदेव पाटीलशी संपर्क केल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात सांगलीतील कुपवाड परिसरातील एक माजी नगरसेवक संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अटकेतील पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्या संपर्कात तो होता, अशी माहिती नवी मुंबई पोलिसांच्या चौकशीतून पुढे आली आहे. दरम्यान, सांगली व कुपवाडच्या चार व्यापाऱ्यांनाही पोलिसांनी यासंदर्भात चौकशीसाठी बोलाविले आहे.

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण