शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
6
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
7
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
8
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
9
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
10
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
11
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
12
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
13
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
14
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
15
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
16
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
17
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
18
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
19
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
20
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई

पोलीस आयुक्त नगराळे यांना हवी मुदतवाढ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 06:57 IST

पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांचा आठवड्यात कार्यकाळ पूर्ण होत असून, सहा महिन्यांची मुदतवाढ मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. अनेक प्रकरणांमुळे वादग्रस्त ठरल्यानंतरही नगराळे यांनी आयुक्तपदाचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. यावरून त्यांना सरकारमधून छुपे पाठबळ असल्याचीही चर्चा रंगली आहे.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई - पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांचा आठवड्यात कार्यकाळ पूर्ण होत असून, सहा महिन्यांची मुदतवाढ मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. अनेक प्रकरणांमुळे वादग्रस्त ठरल्यानंतरही नगराळे यांनी आयुक्तपदाचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. यावरून त्यांना सरकारमधून छुपे पाठबळ असल्याचीही चर्चा रंगली आहे.पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांचा १३ मेला दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. मात्र, त्यात अधिक सहा महिन्यांची मुदतवाढ मिळावी, यासाठी नगराळे यांचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा पोलीस आयुक्तालयात आहे. तर नगराळे यांची फडणवीस कुटुंबीयांशी जवळीक असल्याने त्यांना मुदतवाढ मिळेल, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, नगराळेंचा कार्यकाळ सर्वाधिक वादग्रस्त ठरलेला असतानाही सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचेही आश्चर्य व्यक्त होत आहे. माजी आयुक्त प्रभात रंजन यांनी शहरात कायदा व सुव्यवस्थेची बसवलेली घडी मागील दोन वर्षांत पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांनी नगराळे यांनाच सहआरोपी करण्याचीही मागणी केलेली आहे. यासंदर्भात त्यांनी राष्टÑपतींसह मुख्यमंत्र्यांकडेही मागणी केलेली आहे. त्यानंतरही नगराळे यांना सरकारकडून अभय मिळाले आहे. मागील सहा आयुक्तांमध्ये एकमेव नगराळे यांनी दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. अन्यथा, माजी आयुक्त गुलाबराव पोळ यांना एक वर्ष दोन महिने, अहमद जावेद यांना एक वर्ष १० महिने, ए. के. शर्मा यांना एक वर्ष आठ महिने, के. एल. प्रसाद यांना एक वर्ष तीन महिने, तर प्रभात रंजन यांना अवघ्या ११ महिन्यांचा कार्यकाळ मिळालेला आहे. रंजन यांना बढती मिळाल्याने त्यांची बदली घोषित झाल्याच्या दिवशीच संध्याकाळी त्यांच्या जागी नियुक्त झालेल्या नगराळे यांनी पदभार स्वीकारण्याची कार्यतत्परता दाखवली होती.सहा महिन्यांपूर्वी शहरातील सर्व पोलीसचौक्या बंद करण्याच्या निर्णयाने नागरिकांना तक्रारीसाठी पोलीस ठाण्यापर्यंतची पायपीट करावी लागत आहे. पर्यायी सर्व बिट चौक्या पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सहआयुक्त प्रशांत बुरडे यांनी चालवल्या आहेत. आजवरच्या आयुक्तांपैकी पोळ व शर्मा यांच्यानंतर नगराळेंचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला आहे.रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेतील घोटाळ्या प्रकरणी बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केल्या प्रकरणी विधान परिषदेमध्ये त्यांचा निलंबनाचाही ठराव करण्यात आला. तर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांपासून ते विविध परवान्यांचे अधिकारही राखीव ठेवल्याने उपआयुक्त व सहायक आयुक्तांमध्येही त्यांच्याविषयीची नाराजी वेळोवेळी दिसून आलेली आहे. यानंतरही नगराळे यांना सरकारकडून मिळत असलेल्या छुप्या पाठबळाच्या हेतूवर संशय व्यक्त होत आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबई