शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पीएमसी बँक घोटाळ्याचा पनवेल पालिकेला फटका; शेकडो कर्मचाऱ्यांच्या वेतनावर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 05:11 IST

पीएमसी बँकेतील विविध शाखांमध्ये लाखो ग्राहकांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत.

पनवेल : पनवेल महापालिकेच्या मालकीचे सुमारे सात कोटी ६७ लाख रुपये पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र बँकेत अडकल्याची माहिती समोर आली आहे. २०१८ मध्ये आॅगस्ट महिन्यात ही रक्कम पालिकेने पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र (पीएमसी) या शेड्युल्ड बँकेत ठेवली होती. मात्र, आरबीआयच्या निर्बंधानंतर पीएमसी बॅँकेचे व्यवहार ठप्प झाल्याने त्याचा फटका पनवेल महापालिकेलाही बसणार आहे.पीएमसी बँकेतील विविध शाखांमध्ये लाखो ग्राहकांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. बँकेतील घोटाळा उघडकीस येताच ग्राहकांकडून निदर्शने केली जात आहेत. आरबीआयने केवळ २५ हजार रुपये काढण्याची मुभा खातेदारांना दिल्याने या रकमेत वाढ करण्याची मागणी ग्राहकांकडून केली जात आहे. अनेक खासगी संस्था, मोठमोठ्या सोसायटी आदीचे पैसे पीएमसी बँकेत अडकल्याचे पाहावयास मिळत असताना पनवेल महापालिकेचेही तब्बल सात कोटी ६७ लाख रुपये बँकेत अडकल्याने सर्वसामान्य खातेदारांप्रमाणे पनवेल महापालिका प्रशासनालाही आरबीआय मार्फ त पीएमसी बॅँकेवरील निर्बंध हटविण्याची वाट बघावी लागणार आहे.पनवेल महानगरपालिकेच्या सात कोटी ६७ लाखांच्या रकमेत जवळपास ७५० कर्मचाऱ्यांचे जवळपास दोन महिन्यांचे वेतन अडकले आहे. मात्र, संबंधित रक्कम पीएमसी बँकेत अडकली तरीसुद्धा कर्मचाºयांच्या वेतनावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे पनवेल महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी मनोजकुमार शेटे यांनी सांगितले.महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार, शेड्युल्ड बँकेत खाते उघडण्याची तरतूद करण्यात आली आहे. या शेड्युल्ड बँकेमध्ये, आरबीआयच्या कायद्यानुसार १९३४ च्या शेड्युल्ड दोनमध्ये नमूद असलेल्या बँकांचा समावेश आहे. बँकाच्या यादीमध्ये पीएमसी बँकेचाही समावेश असल्याने पालिकेने पीएमसी बँकेत उघडलेले खाते पूर्णपणे कायदेशीर असल्याची प्रतिक्रिया महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी मनोजकुमार शेटे यांनी दिली.महाराष्ट्र महापालिका अधिनियम काय सांगते?महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार, पालिकेला शेड्युल्ड बँकेत खाते उघडण्याचे पूर्णपणे अधिकार आहेत. शेड्युल्ड बँकेवरही आरबीआयचे नियंत्रण असते. शेड्युल्ड बॅँकांच्या यादीत एचडीएफसी,अ‍ॅक्सेस, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, आयडीबीआय बँक व पंजाब अ‍ॅण्ड महाराष्टÑ बँक (पीएमसी) आदीचा समावेश आहे. यापैकी कोणत्याही शेड्युल्ड बँकेत खाते उघडण्याची तरतूद पनवेल महापालिकेला आहे. मात्र, पीएमसी बँकेची सेवा इतर बँकाच्या तुलनेत चांगली असल्याने ही बँक निवडण्यात आल्याची माहिती शेटे यांनी दिली.

टॅग्स :panvelपनवेल