शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांना विकसित भूखंड, १११ हेक्टर जमिनीचे हस्तांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 09:10 IST

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यामध्ये शासनाने जेएनपीटी बंदर विकसित केले. १९८९ मध्ये या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. प्रत्यक्षात बंदर कार्यान्वित होऊन तीन दशकांचा कालावधी झाल्यानंतरही अद्याप प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यात आले नव्हते.

नवी मुंबई : जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के योजनेअंतर्गत विकसित भूखंड देण्याच्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी जेएनपीटीकडून १११ हेक्टर जमीन सिडकोकडे हस्तांतर करण्यात येणार असून, याविषयी सामंजस्य करारावर शुक्रवारी स्वाक्षरी करण्यात आली. या योजनेचा ११ हजार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यामध्ये शासनाने जेएनपीटी बंदर विकसित केले. १९८९ मध्ये या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. प्रत्यक्षात बंदर कार्यान्वित होऊन तीन दशकांचा कालावधी झाल्यानंतरही अद्याप प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यात आले नव्हते. सिडकोच्या धर्तीवर जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के योजना लागू करावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली हाेती. प्रकल्पग्रस्तांच्या पाठपुराव्यानंतर शासनाने २०१४ मध्ये मागणी मान्य केली होती. या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. अखेर जेएनपीटीने साडेबारा टक्के योजनेअंतर्गत विकसित भूखंड उपलब्ध करून देण्यासाठी १११ हेक्टर जमीन सिडकोकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिडकोला भूखंड वितरणाचा अनुभव असल्यामुळे त्यांच्यावर प्रकल्पग्रस्तांना प्रत्यक्षात भूखंडांचे वाटप करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयात बैठक झाली होती. या बैठकीत सिडकोचे उपाध्यक्ष तथा संचालक डॉ. संजय मुखर्जी, जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी सामंजस्य करारावर सही केली. कराराप्रमाणे जेएनपीटीकडून साडेबारा टक्के योजनेचे भूखंड विकसित करण्यासाठी १११ हेक्टर जमीन सिडकोकडे हस्तांतर करण्यात येणार आहे. ११ हजार लोकांना होणार लाभया क्षेत्रासाठी सिडको विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून काम पाहणार आहे. या योजनेचा आराखडाही सिडको तयार करणार आहे. भूखंड विकसित करण्याकरिता जेएनपीटीकडून सिडकोला विकासापोटी येणारा खर्च तसेच प्रत्यक्ष खर्चाच्या ५ टक्के पर्यवेक्षण शुल्क देणार आहे. नवी मुंबई भूमी विनियोग अधिनियम २००८ नुसार लाभार्थ्यांना भूखंडाचे वाटप करण्यात येणार आहे. भूखंडांचे वाटप करण्यासाठी सिडकोकडून संगणकीय सोडतीचा अवलंब केला जाणार आहे. ११ हजार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.या सामंजस्य कराराच्या माध्यमातून ११ हजार प्रकल्पबाधितांना लाभ मिळणार आहे. सिडकोच्या वतीने साडेबारा टक्के योजनेअंतर्गत सदर भूखंड विकसित करण्यात येणार असून सिडको हे काम चोखपणे करेल, असा विश्वास आहे.- एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री

शासनाने सिडकोच्या क्षमतांवर विश्वास ठेवून ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. सिडको ही जबाबदारी निश्चितच उत्तमरीत्या पार पाडेल, याची खात्री आहे.- डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना