शहरं
Join us  
Trending Stories
1
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
4
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
5
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
6
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
7
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
8
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
9
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
10
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
11
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
12
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
13
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
14
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
15
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
16
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
17
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
18
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
19
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
20
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या

वन्यप्राण्यांच्या जीवाशी होतोय खेळ, राखीव जंगलात पशुपक्ष्यांची सुरक्षा ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 01:24 IST

मात्र, याला जेएनपीटीतील सुमारे २०० हेक्टर क्षेत्रात पसरलेले राखीव जंगल अपवाद ठरू लागले आहे.

मधुकर ठाकूरउरण : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वनसंपदा, वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने कायदे केले आहेत. मात्र, याला जेएनपीटीतील सुमारे २०० हेक्टर क्षेत्रात पसरलेले राखीव जंगल अपवाद ठरू लागले आहे. येथील दुर्मीळ वन्यप्राणी भटकंती व भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनाखाली येऊन हकनाक बळी जात आहेत. वारंवार अशा घटना घडू लागल्या आहेत. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याऐवजी जेएनपीटी प्रशासन आणि वनविभागाचे अधिकारी परस्परांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत.जेएनपीटी बंदर सुमारे ३५०० हेक्टर क्षेत्रावर पसरलेले आहे. यापैकी १२०० हेक्टर क्षेत्र कांदळवन आणि हरितपट्ट्यासाठी आरक्षित आहे. तर इको पार्कसाठी १६० क्षेत्र आरक्षित ठेवण्यात आले आहे. जेएनपीटी प्रशासन भवनाला लागूनच असलेल्या सुमारे १५० ते २०० हेक्टर क्षेत्रावर राखीव जंगल आहे. जेएनपीटी बंदर उभारण्यात येण्यापूर्वीपासूनच हे जंगल अस्तित्वात असून, या जंगलाच्या सीमेला लागूनच शेवा आणि हनुमान कोळीवाडा ही दोन गावे अस्तित्वात होती.जेएनपीटी बंदर उभारणीसाठी ही दोन्ही गावे विस्थापित करण्यात आली. त्यानंतर बंदरासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींचा ताबा आपसूकच जेएनपीटीकडे आला आहे. त्यामुळे वनखात्याच्या अखत्यारीतील राखीव जंगलही जेएनपीटीच्या मालकीचे झाले आहे. या जंगलातच नौदलाच्या एअरफोर्सचा तळही पूर्वीपासून कार्यरत आहे. १९८० च्या दशकात उभारण्यात आलेले जेएनपीटी बंदर आता मे महिन्यात ३२ व्या वर्षात पदार्पण करणार आहे.राखीव जंगल मोर, लांडोर व इतर स्थलांतरित विविध आकर्षक जातीच्या पक्ष्यांच्या वास्तव्यांमुळे आणि किलबिलाटाने गजबजले आहे. याशिवाय दुर्मीळ जातीचे कोल्हे, भेकरे, ससे, माकडे, रानडुक्कर, रानमांजर आदी वन्यप्राणीही मोठ्या संख्येने वास्तव्य करून आहेत. जंगलातील दुर्मीळ कोल्हे, भेकरे भक्ष्याच्या शोधात अनेकदा रात्रीच्या वेळी जंगलाबाहेर पडतात. मात्र, जेएनपीटीच्या बंदरातील कंटेनर वाहतुकीमुळे अपघात होऊन त्यांचा बळी जात आहे.>‘वनविभागाला सहकार्य करणार’जेएनपीटी परिसरातील विविध रस्त्यांवर अशा घटना वारंवार घडत असून त्यामुळे वन्यजीवांना प्राणास मुकावे लागत आहे. याबाबत उपाययोजना करण्याबाबत जेएनपीटी गांभीर्याने विचार करीत असल्याचे प्रोजेक्ट, प्लॉनिंग अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट विभागाचे व्यवस्थापक व्ही. जी. घरत यांनी सांगितले.वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चर्चा करण्याची तयारीही जेएनपीटीने दाखविली आहे. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी वनविभागाने प्रस्ताव दिल्यास जेएनपीटी सहकार्य करेल, अशी माहितीही घरत यांनी दिली.