शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
3
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
4
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
5
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
6
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
7
"तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
8
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
9
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
10
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
11
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
12
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
13
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
14
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
15
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
16
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
17
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
18
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
19
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
20
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’

प्लॅस्टिकविरोधात पालिकेची मोहीम तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 02:11 IST

पंधरा दिवसांत २६ टन साठा जप्त : दारावेसह एपीएमसी परिसरातही छापासत्र

नवी मुंबई : प्लॅस्टिकविरोधात नवी मुंबई महानगरपालिकेने तीव्र मोहीम सुरू केली आहे. होळीपासून शहरामध्ये तब्बल २६ टन साठा जप्त केला असून, ही राज्यातील सर्वात विक्रमी कारवाई आहे. बुधवारीही विविध ठिकाणी छापा टाकून आठ टनांपेक्षा जास्त माल जप्त केला आहे.

शासनाने राज्यामध्ये प्लॅस्टिकबंदी केली आहे; परंतु हे नियम धाब्यावर बसवून व्यापारी बिनधास्तपणे प्लॅस्टिकचा वापर करत आहेत. भाजी मंडईपासून सर्वच ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनीही नागरिकांना वारंवार आवाहन करून प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करू नये, असे आवाहन केले आहे. स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबईने देशपातळीवर नावलौकिक मिळविला आहे. देशातील सातव्या क्रमांकाचे शहर म्हणून नवी मुंबईचा नावलौकिक आहे. गतवर्षी घनकचरा व्यवस्थापनामध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविला होता. शहराचा हा नावलौकिक कायम ठेवण्यासाठी प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणीही काटेकोरपणे होणे आवश्यक आहे; पण व्यापारी व नागरिकही याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे अखेर महापालिकेने कडक कारवाई सुरू केली आहे.

होळी दिवशी महापालिकेने सीबीडी व एमआयडीसीमध्ये छापा टाकून एकाच दिवशी तब्बल १५ टनांपेक्षा जास्त प्लॅस्टिकचा साठा जप्त केला. त्यानंतर शहरभर छापासत्र सुरूच आहे. बुधवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, दारावे गाव व इतर ठिकाणी छापा टाकण्यात आला. तब्बल आठ टनांपेक्षा जास्त प्लॅस्टिक जप्त केले आहे. आयुक्त रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील, महावीर पेंढारी, उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, तुषार पवार, विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांच्यासह पथकाने बुधवारी ही कारवाई केली. महापालिकेने सुरू केलेल्या कारवाईमुळे प्लॅस्टिकचा अवैधपणे वापर करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. नागरिकांनीही प्लॅस्टिकचा वापर केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महापालिकेने दिला आहे.बेलापूरमध्ये दहा टन साठामहापालिकेने २० मार्चला बेलापूर सेक्टर २० मधील सावन हार्मोनी इमारतीच्या मागील भूखंड क्रमांक ८४ वरील इमारतीमध्ये छापा टाकला. याठिकाणी तब्बल दहा टन प्लॅस्टिक व थर्माकोलचा साठा जप्त केला असून ही राज्यातील सर्वात मोठ्या कारवाईमध्ये याचा समावेश आहे.एमआयडीसीमध्ये कारखानासीबीडीमध्ये होळीदिवशी सापडलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांवर पावणे एमआयडीसीमधील प्लॉट नंबर ३३९ वरील कंपनीचा उल्लेख होता. महापालिकेच्या पथकाने तत्काळ त्या कंपनीवर धाड टाकून पाच टन साठा जप्त केला. यामध्ये पिशव्या बनविण्यासाठीच्या कच्च्या मालाचाही समावेश होता.होळीदिवशी दुकानांवर छापाधूलिवंदनला रंग उधळण्यासाठी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा वापर होण्याची शक्यता असल्यामुळे बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे परिसरामधील ३५ पेक्षा जास्त दुकानांवर छापा टाकून ५३५ किलो प्लॅस्टिक जप्त केले आहे.रबाळेमध्ये तीन टन साठामहापालिकेच्या पथकाने २७ मार्चला रबाळे एमआयडीसीमधील आर ५०४ या कंपनीवर छापा टाकला. यामध्ये तब्बल ३ टनपेक्षा जास्त साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मालामध्ये प्लॅस्टिकसह थर्माकोलचाही समावेश होता. संबंधितावर एक लाख रुपयांचा दंडही आकारला होता.एपीएमसीतून तीन टन साठा जप्तमहापालिकेच्या पथकाने बुधवारी एपीएमसीतील माथाडी भवनजवळील दुकानांवर छापा टाकला. दुकानदारांकडून दीड टन साठा जप्त केला व शोभा ट्रेडिंग या व्यावसायिकाकडून दीड टन असा एकूण तीन टनाचा साठा जप्त केला असून त्यांच्याकडून ५० हजार रुपये दंडही वसूल केला आहे.दारावेमध्येही पाच टन साठा सापडलाबुधवारी महापालिकेच्या पथकाने बेलापूर विभागामधील दारावे सेक्टर २३ मध्ये छापा टाकला. त्याठिकाणी तब्बल पाच टनपेक्षा जास्त साठा आढळून आला आहे. संबंधिताकडून ३० हजार रुपये दंडही वसूल करण्यात आला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPlastic banप्लॅस्टिक बंदी